Weather Update Maharashtra : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवसांत अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळं आता पीकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे.
(AFP)मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात पाच ते आठ मार्च दरम्यान वीजेच्या कडकडांसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
(AP)मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा अंदाज आहे. याशिवाय विदर्भातही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय अनेक शहरांमध्येही पाऊस होण्याची शक्यत आहे.
(AP)अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळं मका, केळी आणि पपई या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. याशिवया गव्हाच्या पिकांवर रोगटा पडण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
(TWITTER via REUTERS)