Maharashtra Weather Update : राज्यावर आज देखील अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह मेघ गर्जना, वीजांच्या कडकडाट, गारपीटीसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, व यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्चना विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस व गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात तापमानात थोडी घट झाली असली तरी १५ एप्रिल नंतर पावसाची शक्यता कमी होणार असल्याने तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणाच्या खालच्या थरातील वाऱ्यांची द्रोणीका रेषा ही सौराष्ट्र कच्छ लगतच्या भागावर असलेल्या चक्रीय स्थिती पासून ते कर्नाटक पर्यंत जात आहे. तसेच ही रेषा मध्य महाराष्ट्रातून देखील जाते. त्यामुळे राज्यातील किनारपट्टीवर पावसाची शक्यता नाही. तसेच कोकण, गोव्यात देखील पावसाची शक्यता नाही.
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मध्य महाराष्ट्रातील जळगाव, अहमदनगर, सांगली, सोलापूर, येथे, तर उर्वरित राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्चना विजांचा कडकडाट व वादळीवारासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. 15 एप्रिल नंतर राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता कमी आहे. आज मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली व यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्चना विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस व गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
पुणे व परिसरात १४ एप्रिलपर्यंत आकाश अंशतः ढगाळ राहील व १५ एप्रिलला आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात शुक्रवारी तापमान ३८ डिग्री सेल्सिअस होते. दिवसा हवामान ढगाळ असल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला.
राज्यभरात काहीसे ढगाळ वातावरण राहणार आहे. राज्यात शुक्रवारी सर्वाधिक तापमान हे मालेगाव येथे नोंदवल्या गेले. येथे शुक्रवारी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात अवकाळी, गारपीट, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान घट होऊन तापमान सरासरी ३३.० अंशांवर स्थिर राहिले. मराठवाड्यात तापमान हे सरासरी ३५.५, तर मध्य महाराष्ट्रात सरासरी तापमान हे ३८.० डिग्री सेल्सिअस एवढे राहिले.
संबंधित बातम्या