मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mahaparinirvan Din : इंदू मिलमधील स्मारक लवकर पूर्ण होईल, महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांची घोषणा

Mahaparinirvan Din : इंदू मिलमधील स्मारक लवकर पूर्ण होईल, महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांची घोषणा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Dec 06, 2022 09:56 AM IST

CM Eknath Shinde at Chaitya Bhoomi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यांनी चैत्यभूमी येथे येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंदू मिलमधील स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

इंदू मिलमधील स्मारक लवकर पूर्ण होईल, महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांची घोषणा
इंदू मिलमधील स्मारक लवकर पूर्ण होईल, महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई : माझ्यासारख्या सर्व सामान्य कुटुंबातील नागरिक आज मुख्यमंत्री झाला, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे घडले. दलित समाजात रुजलेली न्यूनगंडाची भावना बाबासाहेबांननी काढून टाकली. दलित बांधवांमध्ये जो आत्मविशास निर्माण झाला, त्याचं श्रेय डॉ. आंबडेकरांना जातं, अशी आदरांजली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहत इंदू मील येथील बाबसहेबांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६६ वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चैत्यभूमीवर जात बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करतांना वरील आश्वासन दिले.

 

एकनाथ शिंदे म्हणाले, सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले. इंदू मिलमधील स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल. आम्ही आढावा घेत पाहणी केली आहे. बाबासाहेब यांचा आठवणी जपण्याचा काम करण्यात येईल. राजगृहवरील ऐतिहासिक ठेवा सुद्धा जपला जाईल. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी रांग लागली आहे. त्यांना सर्व सुविधा देण्याचा काम राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून करण्यात येणार आहे. अनुयायांनी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मुंबई महापालिकेकडे विशेष धन्यवाद व्यक्त करतो. या सोबतच दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र मंत्र्यालायची स्थापना करण्यात आली आहे. याचा लाभ सर्वांना होईल असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या