मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Megablock On Sunday On Central Railway Local Tain Route In Mumbai

Local Train News: मुंबईत रविवार ११ डिसेंबर रोजी ‘या’ मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai suburban local train
Mumbai suburban local train (HT_PRINT)
HT Marathi Desk • HT Marathi
Dec 09, 2022 05:31 PM IST
HT Marathi Desk • HT Marathi
Dec 09, 2022 05:31 PM IST

मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी तसेच देखभालीच्या कामांसाठी येत्या ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकल ट्रेनच्या ५ व्या आणि ६ व्या मार्गांसाठी मेगा ब्लॉक असणार आहे.

मुंबईत मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी तसेच देखभालीच्या कामांसाठी येत्या ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकल ट्रेनच्या ५ व्या आणि ६ व्या मार्गांसाठी मेगा ब्लॉक असणार आहे. यात  ठाणे ते कल्याण मार्गावर ५ वी आणि ६वी लाईन सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत मेगाब्लॉक असेल.

ट्रेंडिंग न्यूज

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे या हार्बरच्या डाउन मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत लोक ट्रेन बंद राहणार आहेत. तसेच हार्बर मार्गावर चुनाभट्टी/वांद्रे  ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत लोकल सेवा बंद राहील.

परिणामी रविवार ११ डिसेंबर रोजी सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई तसेच वडाळा (रोड) स्टेशनवरून वाशी/बेलापूर/पनवेल करीता लोकल सेवा बंद राहणार आहे.

शिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील, असं मध्य रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.

रविवारी पनवेल ते कुर्ला विशेष लोकल ट्रेन 

मध्य रेल्वेच्या रविवारच्या मेगाब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

वसई रोड - दिवा मेमू वसई रोडवरून सकाळी ९.५० वाजता सुटणारी कोपर येथे शॉर्ट टर्मिनेट होईले आणि दिवा-वसई रोड मेमू सकाळी ११.३० वाजता सुटणारी दिवा ऐवजी कोपर येथून सकाळी११.४५ वाजता सुटेल .

अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग

११०१० पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, १७६११ हजूर साहिब नांदेड-मुंबई राज्य राणी एक्सप्रेस, १२१२४ पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, १३२०१ पाटणा-एलटीटी एक्सप्रेस, १७२२१ काकीनाडा-एलटीटी एक्स्प्रेस, १२१२६ पुणे-मुंबई प्रगत एक्सप्रेस, २२१२६ बनवा - एलटीटी एक्स्प्रेस, १२३२१ हावडा-मुंबई मेल, १२८१२ हटिया-एलटीटी एक्स्प्रेस आणि ११०१४ कोईम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट मार्गावर वळवण्यात येईल आणि वेळेनुसार १०-१५ मिनिटे उशिरा पोहोचेल.

मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे मार्ग

११०२९ मुंबई कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, ११०५५ LTT-गोरखपूर एक्सप्रेस आणि ११०६१ LTT-जयनगर एक्सप्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाउन एक्सप्रेस मार्गावर वळवण्यात येईल आणि १०-१५ मिनिटे उशीर होईल.

 

 

WhatsApp channel