Vij Mahanirmiti Recruitment 2024 : राज्यातील बेरोजगार तरूणांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी चालून आली आहे. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी म्हणजेच महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञ पदावर भरती केली जाणार आहे. या साठी जाहिरात काढण्यात आली असून एकूण ८०० पदे भरली जाणार आहे. या पदांसाठी तरुणांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी म्हणजेच महानिर्मितीत तंत्रज्ञ पदांची रिक्त पदे भरली जाणार आहे. एकूण ८०० पदे ही भरली जाणार आहे. १८ ते ३८ वर्ष वयोगातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. निवड झालेल्या उमेदवारांना राज्यात कुठेही नियुक्ती दिली जाणार आहे.
या पदासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. या साठी उमेदवारांची माहिती संगणकावर एकत्रित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी आधी अर्ज करावा लागणार आहे. याची माहिती ही http://www.mahagenco.in या संकेत स्थळावर देण्यात आली आहे. उमेदवारांना या साठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करवा लागणार आहे. वरील संकेतस्थळावर आवश्यक माहिती आणि शुक्ल भरून ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावर भरावा लागणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया ही या २६ नोव्हेंबर पासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २६ डिसेंबर रोजी रात्री २३:५९ वाजेपर्यंतच आहे. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जचं स्वीकारले जाणार आहे. दुसऱ्या पद्धतीने भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाही, अशी महत्वाची सूचना देण्यात आली आहे.
या भरती साठी दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या अरक्षणानुसार ११ टक्के पदे राखीव ठेवण्यात येणार आहे. ८०० पदांपैकी ०८ पदे अनाथ उमेदवारांकरीता देखील राखीव ठेवण्यात हेनर आहे. यातील ०८ पदांपैकी ०४ पदे सामान्य प्रवर्गातील तर ०४ पदे प्रगत कुशल प्रशिक्षणाची उमेदवारांकरीता राखीव ठेवले जाणार आहे.
या पडासाठी अर्ज करण्यासाठी संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आय. टी. आय.) नियमित (रेग्युलर) कोर्स उमेदवारांनी उत्तीर्ण केलेला असावा. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (NCTVT)/(MSCVT) उमेदवाराकडे असावे. या पदासाठी इलेक्ट्रीशियन (वीजतंत्री), वायरमन (तारतंत्री), मशिनिस्ट (यंत्र कारागीर), फिटर (जोडारी), इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम, वेल्डर, इन्स्ट्रयूमेट मेकॅनिक, ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट, बॉयलर अटेंडन्स, स्विच बोर्ड अटेंडन्स, स्टिम टवांईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर स्टिम टर्बाइन ऑपरेटर, ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हंडलॉग इक्वीपमेंट, ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट) या शासनमान्य आय. टी. आय. एनसीव्हीटीव्हीटी व एमएससीव्हीटी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
या पदासाठी नियुक्त झालेल्या उमेदवारांना ३४५५५-८४५. ३८७८०-११४०. ५०९८०-१२६५-८६८६५ वेतन श्रेणी निश्चित करण्यात आली आहे.
शुल्क : खुला प्रवर्ग: ५०० रुपये, मागास प्रवर्ग ३०० रुपये