
Mumbai Local Mega Block: मुंबई लोकमधून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती आहे. अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी येत्या रविवारी (०५ मे २०२४) मध्य रेल्वेकडून उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली. रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यावर थांबून डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचेल.
ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल, मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यावर थांबेल आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येईल आणि गंतव्यस्थानावर १५ मिनिटांनी पोहोचेल.
डाऊन जलद मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ३.३९ वाजता सुटेल. अप जलद मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल,जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११.१० वाजता पोहोचेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव लोकल असेल, जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०४.४४ वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/ वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असेल. सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोडवरून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत बंद राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी गोरेगाव/वांद्रेहून सुटणारी अप हार्बर लाईन सेवा सकाळी १०.४५ ते ५.१३ वाजेपर्यंत बंद राहतील.
महत्त्वाचे म्हणजे, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
संबंधित बातम्या
