मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Megablock: मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; असं आहे वेळापत्रक

Megablock: मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; असं आहे वेळापत्रक

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 06, 2022 11:11 AM IST

Mumbai Local Mega Block : मुंबईत उद्या तीन रेल्वे लाईनवर रुळांच्या कामासाठी मेगाब्लॉक जारी करण्यात आला आहे. त्यामुळं लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

Sunday Mega Block Timetable In Mumbai
Sunday Mega Block Timetable In Mumbai (HT PHOTO)

Sunday Mega Block Timetable In Mumbai : मुंबईत वीकेंडला फिरण्याचा प्लॅन करणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण उद्या मुंबईतील तीन रेल्वे लाईनवर मेगाब्लॉक जारी करण्यात आला आहे. सिग्नल यंत्रणेतील दुरुस्तीच्या कामासाठी आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्तीसाठी उद्या मुंबईत काही ठिकाणी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं आता ऐन रविवारी म्हणजेच वीकेंडच्या दिवशी मुंबईकरांची गैरसोय होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील उद्याच्या मेगाब्लॉकमुळं मध्य, पश्चिम आणि हार्बर लाईनवर त्याचा प्रभाव पडणार आहे. याशिवाय लोकलचं वेळापत्रकही बदलण्यात आलं असून रेल्वे प्रशासनानं रेल्वेचे रुट बदललं आहे. त्यामुळं उद्या वीकेंडला तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल तर त्यावेळी तुम्ही लोकलचे वेळापत्रक काय आहे, हे तुम्ही जाणून घ्यायला हवं.

कुठे असणार मेगाब्लॉक?

सिंग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या माटुंगा ते मुलुंड अप, पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर वसई रोड यार्डाच्या दिवा मार्गावर रात्रकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे.

काय आहे मेगाब्लॉकची वेळ?

डाउन हार्बर मार्गावर आणि पनवेल-वाशी अप रेल्वे मार्गावर (बेलापूर-नेरुळ-खारकोपर रेल्वे लाईन वगळता) उद्या सकाळी ११.०५ ते सायंकाळी ०४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

त्याचबरोबर डाउन जलद मार्गावर आणि मुलुंड अप-माटुंगा रेल्वे लाईन्सवर उद्या सकाळी ११.०५ ते संध्याकाळी ०४.०५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय वसई यार्ड ते दिवा अप डाऊन या मार्गावर मध्यरात्री १२.१५ ते ३.१५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

रेल्वेच्या वेळापत्रकांत काय होणार बदल?

मेगाब्लॉकच्या काळात सीएसटी ते वाशी सेक्शनदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत, याशिवाय ठाणे-वाशी आणि नेरुळ स्थानकादरम्यान ट्रान्सहार्बर रेल्वेलाईनवर लोकल सेवा चालू असणार आहे. सीएसटीवरून सकाळी १०.२५ पासून दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या लोकल रेल्वे डाउन जलद सेवा माटुंगामध्ये धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तर ठाण्यापलीकडील जलद गाड्या डाउन जलद रेल्वे मार्गावर वळवण्यात येणार आहे, त्यामुळं या सर्व लोकल रेल्वे निधारित वेळेच्या १५ मिनिटं उशिरानं धावणार आहेत.

याशिवाय ठाण्यातून सकाळी १०.५० पासून ३.४६ पर्यंत सुटणाऱ्या लोकल मुलुंडमधील धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे, तर माटुंगा आणि मुलुंड स्टेशनवर तेथील वेळापत्रकानुसारच लोकल थांबणार आहेत.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या