मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mega Block : मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉग, तर हार्बर मार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत; वेळापत्रक पाहून बाहेर पडा

Mega Block : मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉग, तर हार्बर मार्गावरील वाहतूक मात्र सुरळीत; वेळापत्रक पाहून बाहेर पडा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 16, 2023 08:21 AM IST

Mumbai Local Mega Block : महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या आयोजनामुळे हार्बर लाईनवरचा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. असे असले तर आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉग ठेवण्यात येणार आहे.

Mumbai Local Mega Block
Mumbai Local Mega Block (HT_PRINT)

मुंबई : रेल्वेलाइनच्या कामामुळे आज मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. यामुळे हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द केल्याने या मार्गावरील लोकल वाहतूक ही सुरुळीत असणार आहे.

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी आज मध्य मार्गावर आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. या बाबतची माहिती मध्य रेल्वेने दिली होती. दरम्यान, महाराष्ट्र भूषण कार्यक्रमा मुळे हार्बर लाईनवरचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. रेल्वेने ही मागणी मान्य केली असून या मार्गावरचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.

ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचेल. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासाने दिली.

आज हार्बर लाईनवरील वाहतूक सुरळीत

हार्बर लाईनवर यापूर्वी जाहीर केलेला मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र, मेनलाईन वर माटुंगा-मुलुंड जलद मार्गावर अगोदर जाहीर केल्याप्रमाणे मेगा ब्लॉक राहणार आहे.

IPL_Entry_Point