Mumbai local Megablock : देखभाल दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मुंबईत उद्या तिन्ही मार्गावर रेल्वे मेगा ब्लॉक घोषित करण्यात आल आहे. माटुंगा ते मुलुंड व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान हा मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हा ब्लॉक बोरिवली ते गोरेगावदरम्यान पश्चिम रेल्वेने घोषिक्त केला आहे. ब्लॉककाळात काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्या या उशिराने धावणार आहेत. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पाहून प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य रेल्वे स्थानकादरम्यान, माटुंगा ते ठाणे दरम्यान, उद्या मेगा ब्लॉक घोषित करण्यात आल्या आहेत हा ब्लॉक अप आणि डाउन धीमा मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ दरम्यान, राहणार आहे. त्यामुळे अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही लोकल फेऱ्या उशिराने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे मार्गावर देखील मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० दरम्यान हा ब्लॉक राहणार असून या दरम्यान, सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाउन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ब्लॉकवेळेत कुर्ला फलाट क्रमांक आठवरून पनवेलसाठी विशेष लोकल फेऱ्या धावण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत हा ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक काळात अप-डाउन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत. तर गोरेगावपर्यंत हार्बर विस्तारीकरणाच्या कामांमुळे बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक १, २, ३, ४ वरून कोणतीही लोकल धावणार नाही. यामुळे काही लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या