मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  mega block news : कल्याण-कसारा मार्गावर आज व उद्या रात्री विशेष ब्लॉक, काही गाड्या रद्द, काही रखडणार

mega block news : कल्याण-कसारा मार्गावर आज व उद्या रात्री विशेष ब्लॉक, काही गाड्या रद्द, काही रखडणार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 24, 2022 10:49 AM IST

kalyan kasara mega block news : पायाभूत सुविधांच्या कामासाठी कल्याण-कसारा विभागात २४ व २५ डिसेंबर रोजी रात्री विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Kalyan Kasara Special traffic block
Kalyan Kasara Special traffic block

kalyan kasara mega block news : विविध प्रकारच्या पायाभूत सेवासुविधांच्या कामासाठी कल्याण-कसारा विभागात आज, २४ डिसेंबर व उद्या, २५ डिसेंबर रोजी रात्री विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळं काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेनं या संदर्भातील माहिती दिली आहे.

या वेळेत पुढील मार्गावर वाहूतक बंद

  • कसारा- खर्डी अप मार्गावर ००.३० ते ०३.४५ पर्यंत.
  • वासिंद - आटगाव अप आणि डाउन मार्गावर ०२.२० ते ०४.२० पर्यंत
  • खडवली - आसनगाव अप आणि डाउन मार्गावर ०२.०५ ते ०५.०५ पर्यंत
  • खडवली-आंबिवली अप मार्गावर ०१.४० ते ०४.४० पर्यंत

 

या गाड्या रद्द… या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये बदल 

 

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.५० वाजता सुटणारी कसारा लोकल आटगाव स्थानकात थांबेल
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१४ वाजता सुटणारी कसारा लोकल आणि कसारा येथून ०३.५१ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी लोकल रद्द
  • २२५३८ लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्सप्रेस खडवली ते कसारा दरम्यान सर्व स्थानकांवर थांबेल.
  • ११४०२ आदिलाबाद- मुंबई एक्सप्रेस कसारा ते खडवली दरम्यान सर्व स्थानकांवर थांबेल.

 

'या' एक्स्प्रेस गाड्या खोळंबणार

 

गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस.

अमरावती - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस.

गोंदिया- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस.

शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेल (नागपूर मार्गे)

शालीमार- लोकमान्य टिळक टर्मिनस समरसता एक्सप्रेस.

सिकंदराबाद- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस देवगिरी एक्सप्रेस

IPL_Entry_Point