मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “त्यामुळे राऊतांना भेटलो, मी गेले नसते तर..” नवनीत राणांचा लडाख भेटीवर खुलासा

“त्यामुळे राऊतांना भेटलो, मी गेले नसते तर..” नवनीत राणांचा लडाख भेटीवर खुलासा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 20, 2022 07:32 PM IST

खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊत यांची लेह-लडाखमध्ये झालेल्या भेटीबद्दल खुलासा केला आहे.

नवनीत राणांचा लडाख भेटीवर खुलासा
नवनीत राणांचा लडाख भेटीवर खुलासा

नवी दिल्ली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करण्याच्या प्रकरणावरून खासदार नवनीत राणा आणि शिवसेनेमध्ये कमालीचा वाद चिघळला होता. नवनीत राणा यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी खारघरमधील घरातून बाहेर पडू दिले नव्हते. त्यावेळी संजय राऊत शिवसेनेच्या वाटेला जाल तर जमिनीत २० फूट गाडले जाईल. ज्यांना शिवसेनेशी संघर्ष करायचा आहे त्यांनी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून याव्यात, असा घणाघात नवनीत राणा व रवी राणा यांच्यावर केला होता. 

म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार मी संजय राऊत यांची भेट घेतली.  तरुंगामध्ये मी जे भोगलंय ते संजय राऊत यांना काय माहिती, असेही राणा म्हणाल्या. 

खासदार नवनीत राणा यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय राऊत यांची लेह-लडाखमध्ये झालेल्या भेटीबद्दल खुलासा केला आहे.

राणा म्हणाल्या  की, मी जेव्हा लडाखला गेले, तेव्हा कळलं ही संजय राऊत सुद्धा तिथे आहेत. ते तिथे आहेत म्हणून मी गेले नसते तर माझ्या कर्तव्यावर अन्याय झाला असता, म्हणून मी त्यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार मी संजय राऊत यांच्या सोबत लेहमध्ये वागले, त्यांना जरी महाराष्ट्राची संस्कृती माहीत नसेल पण मला माहित आहे. १४ दिवस मी तुरुंगात होते, तो त्रास मी भोगला आहे. संजय राऊत यांना काय माहित आहे, असं नवनीत राणा म्हणाल्या.

त्याचबरोबर नवनीत राणा म्हणाल्या की, माझी लढाई अजूनही सुरू आहे,  माझ्यासोबत जो काही प्रकार घडला त्याबद्दल मी २३ तारखेला संसदेच्या समितीसमोर माझी बाजू मांडणार आहे. 

संसदीय समितीच्या संरक्षण समितीचे सदस्य सध्या लडाख दौऱ्यावर होते. या दौऱ्यात एकूण ३० खासदारांचा समावेश असून त्यात खासदार संजय राऊत आणि खासदार नवनीत राणा यांचा समावेश होता. खासदाराला आपल्यासोबत कुटुंबातील एका व्यक्तीला सोबत घेण्याची परवानगी होती आणि त्यामुळेच नवनीत राणा यांच्यासोबत आमदार रवी राणा हे लडाख दौऱ्यात सुद्धा उपस्थित होते. यावेळी एकमेकांवर टीका करणारे संजय राऊत आणि नवनीत राणा हे एकत्र दिसून आले. आमदार रवी राणा आणि संजय राऊत हे एकमेकांसोबत जेवण करतानाही दिसून आलं आहे. 

IPL_Entry_Point

विभाग