
यवतमाळ येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने आपली जीवन यात्रा संपवली आहे. ही तरुणी शहरातील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती. या घटनेने खळबळ माजली आहे. सुहानी ढोले अस मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने २८ डिसेंबरच्या रात्री गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.
या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास यवतमाळ शहर पोलीस करत आहे. पोलिसांना घटनास्थळी दोन पानाचे पत्र आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. सुहानीने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आले नाही. मृत विद्यार्थिनीने पत्रात नेमकं काय लिहिले आहे, हे अद्याप कळू शकले नाही. तसेच मेडिकल कॉलेज प्रशासनाने याबाबत काहीच माहिती दिलेली नाही.
सुहानी ढोले यवतमाळ येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत होती. काही महिन्यांपूर्वी याच कॉलजमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थीनीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. काही महिन्यापूर्वी एका रुग्णाने या रग्णालयातील दोन डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला होता.
संबंधित बातम्या
