Thane Traffic News Live Today : ठाण्यातील नेहमीच वर्दळीचा मार्ग असलेल्या घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाल्याची माहिती समोर आली आहे. गायमुखच्या दिशेने निघालेलं एक अवजड वाहन बंद पडल्याने मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. परिणामी घोडबंदर मार्गावर नवघर पर्यंत वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यानंतर आता वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. वाहतूक कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. घोडबंदर मार्गावरील गायमुख ते भाईंदर दरम्यान ही वाहतूक कोंडी झाली असून त्यामुळं वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील घोडबंदर मार्गावर आज सकाळी एक अवजड वाहन बंद पडलं आहे. त्यामुळं मार्गावरील संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी गुजरात, वसई आणि भाईंदरच्या दिशेने जाणारी वाहनं खोळंबली आहे. गायमुख येथे झालेल्या या घटनेमुळं संपूर्ण महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या असून प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. गेल्या तासाभरापासून असंख्य वाहनचालक घोडबंदर मार्गावर अडकून पडल्याची माहिती आहे.
ठाण्यातील गायमुख ते भाईंदरच्या नवघर पर्यंत असंख्य वाहनांचा रांगा लागल्या आहे. अवजड वाहन घोडबंदर मार्गावर बंद पडल्यानंतर कोंडी झाली. तसेच काही वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहतूक करत असल्याने देखील कोंडीत भर पडल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं सकाळपासून वाहतूक कोंडीत अडकून पडलेले वाहनचालक आणि प्रवाशांनी संताप व्यक्त करत पोलिसांना दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.