रायगड जिल्ह्यातील उरणमधील एका गोदामाला सोमवारी दुपारच्या सुमारास आग लागली. उरण तालुक्यातील कंठवली गावात आगीची भीषण घटना समोर आली आहे.आग इतकी भीषण होती की, दुरवरून आग व धुराचे लोट आकाशात दिसत होता. आगीवर नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दूरवरुनही आग दिसून येत आहे. धुराचे लोट आकाशाला भिडल्याचे दिसत आहेत.
कंठवली गावातील गव्हाण चिरनेर मार्गावर असणाऱ्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच, ओएनजीसी, जेएनपीटी आणि उरण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्नीशमन दलाच्या जवानांकडून सुरु आहेत. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.