Mumbai Fire: मुंबईतील वांद्रे परिसरात भीषण आग, २० ते २५ झोपड्या जळून खाक, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Fire: मुंबईतील वांद्रे परिसरात भीषण आग, २० ते २५ झोपड्या जळून खाक, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

Mumbai Fire: मुंबईतील वांद्रे परिसरात भीषण आग, २० ते २५ झोपड्या जळून खाक, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर

Jan 04, 2025 07:27 PM IST

Mumbai Bandra East Fire: मुंबईतील वांद्रे परिसरात आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत २० ते २५ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.

मुंबईतील वांद्रे परिसरात भीषण आग, २० ते २५ झोपड्या जळून खाक
मुंबईतील वांद्रे परिसरात भीषण आग, २० ते २५ झोपड्या जळून खाक

Mumbai Fire News: मुंबईतील वांद्रे भागात शनिवारी (०४ जानेवारी २०२४) दुपारी भीषण आग लागली. या आगीत २० ते २५ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.

मुंबईतील वांद्रे पूर्व येथील ज्ञानेश्वर नगर येथील ओएनजीसी कॉलनीत आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत २० ते २५ झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीच्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यात झोपड्यांना मोठी आग लागल्याचे दिसत आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या आगीमुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली. आगीचे कारण अस्पष्ट असून स्थानिक पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर