मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dombivli Fire: डोंबिवली येथील निवासी इमारतीला भीषण आग, सहा मजल्याच्या गॅलरी जळून खाक!

Dombivli Fire: डोंबिवली येथील निवासी इमारतीला भीषण आग, सहा मजल्याच्या गॅलरी जळून खाक!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 13, 2024 06:09 PM IST

Dombivli Khoni Fire: डोंबिवलीच्या खोणी येथील टाटा ओरोलिया निवासी इमारतीला आग लागल्याची घटना घडली.

Dombivli Fire
Dombivli Fire

Dombivli Residential Building Fire: डोंबिवलीच्या खोणी येथील टाटा ओरोलिया निवासी इमारतीला आज दीड वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नशमन दलाच्या जवानांना यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहान झाली नसल्याचे माहिती पलावा अग्निशमन केंद्रातून मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग लागली. त्यानंतर आग इतर मजल्यांवर पसरली. सुदैवाने, तिसऱ्या मजल्यापर्यंत लोक राहत होते. आगीची माहिती मिळताच सर्व रहिवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. आग शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात असून आगीत कोणतीही जीवितहान झाली नाही. आगीच्या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला.

मुंबई: पावणे एमआयडीसीत रासायनिक कंपनीला भीषण आग

या महिन्याच्या सुरुवातीला मुंबईतील पावणे औद्योगिक वसाहतीत भीषण एका रासायनिक कंपनीला भीषण आग लागली. मेहके केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड येथे ही आग लागली होती. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

WhatsApp channel