Bhosri MIDC Fire : पुण्यातील पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या भोसरी एमआयडीसी परिसरात पुन्हा एका कंपनीला रविवारी रात्री भीषण आग लागली. भोसरी एमआयडीसी सेक्टर दहा औद्योगिक परिसरात ऋषी पॉलि बॉण्ड या प्लॅस्टिक कंपनीला ही आग लागली आहे. या आगीत मोठे नुकसान झाले आहे. आगीच्या ज्वाळा दूरपर्यंत दिसत होत्या. रात्री, उशिरा पर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. कंपनीला सुट्टी असल्याने मोठी दुर्घटना व जीवित हानी झाली नाही. ही आग आग नेमकी कशी लागली याचे कारण समजू शकले नाही.
मिळालेल्या महितीनुयासार, रविवारी रात्री ११ च्या सुमारास भोसरी एमआयडीसी सेक्टर १० परिसरातील ऋषी पॉली बॉण्ड या प्लास्टिक मोल्डिंग करणाऱ्या कंपनीला आग लागली. या आगीत संपूर्ण प्लास्टिक कंपनी भस्मसात झाली. रविवार असल्याने या कंपनीला सुट्टी होती. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होते.
रविवारी सायंकाळी ८ च्या सुमारास कंपनीती असलेल्या काही साहित्याला आग लागली. या आगीने काही क्षणातच उग्र रूप धारण केले. स्थानिकांनी या आगीची माहिती अग्निशामक दलाला दिली. त्यानंतर काही वेळातच अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कंपनीत प्लास्टिकचे साहित्य होते. यामुले आगीने भीषण रूप धारण केले होते. परिसरात आगीचे व धुराचे लोट पसरले होते. दरम्यान, पालिकेच्याअग्निशामक दलासोबत पीएमआरडीए व खासगी कंपन्यांच्या एकूण १५ ते २० बंब घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशिरा या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
पिंपरीचिंचवड परिसरात आगीचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी देखील येथील गोदामांना भीषण आग लागली होती. त्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या परिसरात असणाऱ्या सर्व कंपण्याचे फायर ऑडिट करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.
संबंधित बातम्या