Lalbaugcha Raja 2023 : लालबागच्या राजाच्या दरबारात तुफान राडा; भाविकांमध्ये तुंबळ हाणामारी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lalbaugcha Raja 2023 : लालबागच्या राजाच्या दरबारात तुफान राडा; भाविकांमध्ये तुंबळ हाणामारी

Lalbaugcha Raja 2023 : लालबागच्या राजाच्या दरबारात तुफान राडा; भाविकांमध्ये तुंबळ हाणामारी

Published Sep 22, 2023 11:32 AM IST

Lalbaugcha Raja 2023 : गणपतीच्या दर्शनासाठी दरबारात गेलेल्या भाविकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Lalbaugcha Raja Ganpati Mandal
Lalbaugcha Raja Ganpati Mandal (HT)

Lalbaugcha Raja Ganpati Mandal : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळत आहे. अनेक भाविकांनी गणपती बाप्पांचं दर्शन घेत पूजाअर्चा करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातील भाविकांनी गर्दी केली. परंतु आता लालबागच्या राजाच्या दरबारात भाविक आणि कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या बाप्पांच्या दरबारात आरती करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. त्यातच आता दरबारात काही लोकांमध्ये तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लालबागच्या राजाच्या दरबारात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. त्यावेळी भाविकांना पांगवत असताना मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये प्रचंड हाणामारी झाली आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून काही भाविकांना मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत काही लोकांना मार लागला असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

दरबारात नेमकं काय झालं?

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी दरबारात मोठी गर्दी केली होती. त्यावेळी गर्दी अनियंत्रित होताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाविकांना दरबारातून हटवण्यास सुरुवात केली. परंतु त्याचवेळी मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविकांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर प्रकरण शिवीगाळ होण्यापर्यंत पोहचताच भाविक आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी लालबागच्या राजाच्या दरबारातील काही लोकांनी मध्यस्थी करून वाद मिटवला आहे. परंतु या घटनेमुळं मुंबईतील भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या