Jalna Factory Blast: जालन्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात भीषण स्फोट, दोन जण ठार!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jalna Factory Blast: जालन्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात भीषण स्फोट, दोन जण ठार!

Jalna Factory Blast: जालन्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात भीषण स्फोट, दोन जण ठार!

Dec 26, 2024 09:15 PM IST

Jalna Bageshwari Sugar Factory Blast: जालन्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात स्फोट झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले आहेत.

जालन्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात भीषण स्फोट
जालन्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात भीषण स्फोट

Jalna News: जालना येथील परतूर तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

जालना येथील बागेश्वरी साखर कारखान्यात सल्फर टाकीचा स्फोट झाल्याची घटना घडली. या घटनेत आप्पासाहेब पारखे आणि अशोक देशमुख यांचा या स्फोटात जागीच मृत्यू झाला. तर, नवनाथ पंढरपोटे आणि कदिर युनूस पटेल हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी जालना येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा स्फोट कशामुळे झाला? याबाबत अद्यात कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर