मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kurla Rape Case : मुंबईत महिलेवर घरात घुसून सामूहिक बलात्कार; प्रायव्हेट पार्टवर दिले सिगारेटचे चटके

Kurla Rape Case : मुंबईत महिलेवर घरात घुसून सामूहिक बलात्कार; प्रायव्हेट पार्टवर दिले सिगारेटचे चटके

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 05, 2022 08:21 AM IST

Mumbai Rape Case : नराधम आरोपींनी आधी महिलेवर सामूहिक बलात्कार करून धारदार शस्त्रानं तिच्यावर सपासप वार करत प्रायव्हेट पार्टवर सिगारेटचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Rape Case In Kurla Mumbai
Rape Case In Kurla Mumbai (HT_PRINT)

Rape Case In Kurla Mumbai : विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याच्या धक्कादायक घटनेनं देशाची आर्थिक राजधानी मुंबई हादरली आहे. शहरातील कुर्ला परिसरात तीन आरोपींनी महिलेच्या घरात घुसून बलात्कार केल्याची घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. नराधम आरोपींनी महिलेवर आधी रेप केला आणि त्यानंतर तिला मारहाण करत प्रायव्हेट पार्टवर सिगारेटचे चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यानंतर आता पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ल्यात तीन आरोपींनी विवाहित महिलेच्या घरात घुसून आधी तिला मारहाण केली. त्यानंतर तिघांनीही आळीपाळीनं महिलेवर बलात्कार केला. याशिवाय महिलेच्या गुप्तांगाला आरोपींची चटके दिल्यानं पीडित महिला गंभीर जखमी झाली आहे. याशिवाय आरोपींनी पीडितेशी अनैसर्गिकरीत्य लैंगिक संबंध प्रस्तापित केल्यानं ती बेशुद्ध झाली होती. त्यानंतर आता पीडितेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोपींनी महिलेवर बलात्कार करताना त्याचा व्हिडिओ शूट केला असून घटनेची वाच्यता केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली आहे.

पीडितेनं घडलेला सारा प्रकार शेजाऱ्यांना सांगितल्यानंतर घटनेचा भांडाफोड झाला. त्यानंतर शेजाऱ्यांनी पीडितेचा संपर्क एका सामाजिक संस्थेशी करून दिला. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे.

IPL_Entry_Point