मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Solapur Shocking: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवले, सोलापूरमधील घटना!

Solapur Shocking: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहित महिलेने आयुष्य संपवले, सोलापूरमधील घटना!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 09, 2023 07:27 PM IST

Solapur Suicide: सोलापूरमध्ये प्रियकराच्या त्रासाला वैगातून एका विवाहित महिलेने स्वत:चे आयुष्य संपवले.

Crime (Representative use)
Crime (Representative use) (HT_PRINT)

Solapur Shocking: सोलापूरच्या जुना विडी घरकुल परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.प्रियकराच्या त्रासाला वैगातून एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी प्रियकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या त्रासाला वैतागातून महिलेने आत्महत्या केल्याची तिच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कविता कल्याणम असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, कोरोना महामारी सुरू होण्याअगोदर कविताचा पती रोजगार शोधण्यासाठी तामिळनाडू येथे गेला होता. त्यावेळी कविता आणि शेजारी राहणारा आरोपी संदीप राठोड यांच्यात प्रेमसंबंध जुळले. याबाबत कविताच्या पतीला कुणकुण लागल्यानंतर त्याने तिची समज दिली. तसेच कविताला असे पुन्हा होऊ नये, अशी ताकीद दिली. यानंतर या दोघांचे प्रेमप्रकरण तुटले. यानंतर कविता ही सासरकडील घर सोडून जुना विडी घरकुल परिसरात राहायला आली.मात्र, आरोपीने तिची पाठ सोडली नाही. शेवटी कविताने वैतागून आपल्या आयुष्याचा शेवट केला. मृत कविताला 11 वर्षांचा मुलगादेखील आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि आरोपी यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरु होते. मात्र, काही दिवसानंतर दोघांमधील प्रेमसंबंध तुटले. दरम्यान, रविवारी मध्यरात्री आरोपी मृत महिलेच्या घरी येऊन दरवाजा ठोठवत होता. तो बराच वेळ दरवाजा ठोठवत राहिला. वैतागून महिलेने दरवाजा उघडताच आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. तसेच माझ्याशी प्रेमसंबंध तोडू नको, अशीही धमकी दिली. या आरोपीच्या त्रासाला वैतागून महिलेने पहाटे गळफास लावून आत्महत्या केली. आरोपी वारंवार या महिलेला त्रास देत होता अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली. तसेच आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देखील केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग