मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Solapur Crime : अफेअर बेतले जिवावर; पतीने माफी दिल्यावर प्रियकर त्रास देत असल्याने विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

Solapur Crime : अफेअर बेतले जिवावर; पतीने माफी दिल्यावर प्रियकर त्रास देत असल्याने विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 08, 2023 07:20 AM IST

Solapur Crime : सोलपुरात एका विवाहितेला प्रेम प्रकरण जिवावर बेतले आहे. शेजारी राहणाऱ्या तरूणावर तिचा जीव जडला. मात्र, ही बाब पतीला कळली. त्याने ताकीद देऊन तिला माफ केले. मात्र, प्रियकर सातत्याने त्रास देत असल्याने विवाहितेने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले.

सोलापूर क्राइम
सोलापूर क्राइम

सोलापूर : प्रियकरांच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील जुना विडी घरकुल परिसरात उघडकीस आली आहे. विवाहितेन गळफास घेऊन आपले जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली.

कविता कल्याणम असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिचा प्रियकर संजय राठोड (विजय ब्रम्हनाथ नगर, मुळेगाव रोड, सोलापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कविता कल्याणम हीचा पाती हा कोरोना महामारी सुरू होण्याआधी रोजगाराच्या शोधात तामिळनाडू येथे गेला होता. त्यावेळी त्याने कविताला सासरी सोडले होते. दरम्यानच्या काळात कविटाचे शेजारी राहणाऱ्या संदीप राठोडसोबत सूत जुळले. दोन वर्षांपासून कविताचे संदीप यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र, ही बाब कविताचा पतीला समजली.

त्याने ही बाब कविताच्या घरी सांगत तिला समज दिली. तसेच तिला माफ करत पुन्हा असे न करण्याची ताकीद देखील दिली. कविताने देखील संजय सोबत त्याचे संबंध तोडले. मात्र, संजय राठोड तिला सोडायला तयार नव्हता. कविता ही सासरकडील घर सोडून जुना विडी घरकुल परिसरात राहावयास आली होती. मात्र, प्रियकर संदीप राठोड हा कविता कल्याणमची पाठ सोडत नव्हता.

५ मार्चला संदीप राठोड हा कविताच्या घरी मध्यरात्री आला. त्याने बराचवेळ दार ठोठावल्याने कविताने दार उघडले. संजयने घरात येऊन कविटला बेदम मारहाण केली. मला सोडू नकोस असे सांगून तो निघून गेला. त्याचा हा त्रास सहन न झाल्याने अखेर कविटाने पहाटेच्या सुमारास साडीच्या साह्याने गळफास घेत आत्महत्या केली. कविता हिला ११ वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, संदीप राठोड वारंवार कविता कल्याणमला त्रास देत असल्याने तिने आत्महत्या केल्याने एमआयडीसी पोलिसानी प्रियकर संजय राठोडवर गुन्हा दाखल केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग