Bajar Samiti news : राज्यभरातील बाजार समित्यांमद्धे माथाडी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे विधेयक मागे घेण्यात यावे या मागणीसाठी आज राज्यभरातील बाजार समित्यांनी कडकडीत बंड पाळला. राजभरातील सर्व बाजार समित्यात आज शुकशुकाट होता तर शेतमालची आवक झाली नसल्याने कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती.
विविध मागण्यासाठी राज्यभरातील कामगार संघटनांनी सोमवारी बंद पाळला. पुणे विभागातील शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस पाठविला नाही. राज्यातील, पुणे, मुंबई, नाशिकसह अनेक बाजार पेठा आज बंद राहिल्याने शेतमालाची आवक झाली नाही. माथाडी कामगार देखील या बंद मध्ये सहभागी झाले होते.
राज्य शासनाने कृषी उत्पन्न पणन अधिनियम विधेयकात सुधारणा प्रस्तावित केल्याने बाजार समितीसह समितीतील सर्वच घटकांचे अस्तित्व नष्ट होणार असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. बाजार समित्यांवर प्रशासक बसवण्याचा घाट सुरू असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. त्यामुळे पुकारण्यात आलेल्या या आंदोलनांला १५ बाजार समित्यांनी प्रतिसाद दिला.
नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह बाजार पेठ बंद राहिल्याने आज कांद्याची आवक झाली नाही. यामुळे व्यापऱ्यांचे आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. पुण्यात श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटना बंदमध्ये सहभागी झाल्याने पुणे परिसरात भाजीपाल्याची आवक झाली नाही.
नागपूर येथील कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजारपेठ देखील आज बंद होती. लाक्षणिक संपाला पाठिंबा देत धान्य बाजाराने सोमवारी बाजारपेठ बंद ठेवण्यात आले होते.
संबंधित बातम्या