Heavy rain in state : मराठवाडा, विदर्भाला पावसानं झोडपलं! नद्यांना पुर, शेती गेली पाण्याखाली; आजही जोरदार पावसाचा इशारा-marathwada vidarbha lashed by rain rivers flooded agriculture went under water warning of heavy rain today ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Heavy rain in state : मराठवाडा, विदर्भाला पावसानं झोडपलं! नद्यांना पुर, शेती गेली पाण्याखाली; आजही जोरदार पावसाचा इशारा

Heavy rain in state : मराठवाडा, विदर्भाला पावसानं झोडपलं! नद्यांना पुर, शेती गेली पाण्याखाली; आजही जोरदार पावसाचा इशारा

Sep 02, 2024 07:52 AM IST

Heavy rain in state : विदर्भ, मराठवड्याला पावसाचे चांगलेच झोडपले आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, अमरावती, चंद्रपूर आदि जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मराठवाडा, विदर्भाला पावसानं झोडपलं! नद्यांना पुर, शेती गेली पाण्याखाली; आजही जोरदार पावसाचा इशारा
मराठवाडा, विदर्भाला पावसानं झोडपलं! नद्यांना पुर, शेती गेली पाण्याखाली; आजही जोरदार पावसाचा इशारा

Heavy rain in state : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात जोरदार पावसाने आगमन केले आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत तर विदर्भात काही जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे नद्या, नाल्यांना पुर आला आहे. पुराच्या पाण्यात जनावरे वाहून गेली आहे. तर शेती देखील पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. बुलडाणा, हिंगोली, परभणी व वाशिम जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आज देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. परभणीत पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टर शेती पाण्यासाठी गेल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. वाशिम येथील शेलूबाजार परिसरातील कारंजा रोड येथील सेंट्रल बँक, स्टेट बँक एटीएम व येथील ग्रामपंचायतच्या गाळ्यांमध्येही पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे येथे असणाऱ्या दुकानांमधील साहित्याचे नुकसान झाले.

मराठवाड्यातील परभणी, नांदेड, बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात अकोली नदीला पूर आल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या तालुक्यातील अकोली, भोसी, वरुड(नृ), बलसा, मालेगाव, पाचलेगाव, दगडचोप, चारठाणा आदि गावात पुराचे पाणी शेतात घुसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पुराचा सोयाबीन, कापूस, हळदीसह आदी पिकांना फटका बसला आहे.

हिंगोली जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस

हिंगोलीत जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतीला फटका बसला आहे. येथील सावरखेडा गावामध्ये काही ठिकाणी पूर आला आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बचावले आहे. जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण ९५ टक्के भरल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

बीडमध्येही जोरदार पाऊस

बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे परळी-बीड मार्गावरील पापनाशिणी नदीवर पूल वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. येथील शिवाय वाण - वाप नदीच्या पुलावर देखील पाणी साचले आहे. पावसामुळे परळीहून बीड कडे जाणारी वाहतूक नागापूरहून शिरसाळाच्या दिशेने वळवली आहे.

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी

नादेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. किनवट तालुक्यात १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सिंदगी, उमरी बाजार व किनवट या मंडळात पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. किनवटसोबतच हिमायतनगर, माहूर, हदगाव, भोकर, अर्धापूर, मुदखेड, या तालुक्यांत पुरस्थिती निर्माण झाली आहे.

अकोल्यातील काटेपूर्णा धरण भरले

अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरण पूर्ण भरले आहे. धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. धरण हे ९६.६ टक्के भरले. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

विभाग