राजकीय वातावरण ढवळून निघणार! दसऱ्याच्या मुहूर्तावर रंगभूमीवर धडकणार ‘५० खोके एकदम ओके’
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राजकीय वातावरण ढवळून निघणार! दसऱ्याच्या मुहूर्तावर रंगभूमीवर धडकणार ‘५० खोके एकदम ओके’

राजकीय वातावरण ढवळून निघणार! दसऱ्याच्या मुहूर्तावर रंगभूमीवर धडकणार ‘५० खोके एकदम ओके’

Published Oct 12, 2024 10:13 AM IST

50 Khoke Ekdam Ok : राज्यातील सध्याच्या राजकारणावर विडंबनात्मक भाष्य करणारं '५० खोके एकदम ओके' हे नाटक आज रंगभूमीवर येत आहे. या नाटकाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

राजकीय वातावरण तापणार! दसऱ्याच्या मुहूर्तावर रंगभूमी गाजवणार ‘५० खोके एकदम ओके’
राजकीय वातावरण तापणार! दसऱ्याच्या मुहूर्तावर रंगभूमी गाजवणार ‘५० खोके एकदम ओके’

50 Khoke Ekdam Ok : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राज्यातच नव्हे तर देशातही गाजलेल्या ‘पन्नास खोके एकदम ओके’ या घोषणेचंच शीर्षक असलेलं धम्माल विडंबननाट्य आज दसऱ्याच्या मुहूर्तावर रंगभूमीवर येत आहे. दसरा मेळाव्यांच्या निमित्तानं राजकीय फटाके फुटणार असतानाच हे नाटक येत असल्यानं राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे. 

हे नाटक रंगभूमीवर आणण्यासाठी वेळही अचूक निवडण्यात आली आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे मुंबईत दसरा मेळावे होत आहेत. त्याच्या काही तास आधी कल्याणमधील एका नाट्यगृहात या नाटकाचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे.

मराठी नाटक या विषयावर चाणाक्षपणे भाष्य करताना दिसते. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात १२ ऑक्टोबर रोजी उद्घाटन सोहळा होणार आहे. जयवंत भालेकर लिखित आणि अशोक हर्ष निर्मित या मालिकेचा दुसरा कार्यक्रम १३ ऑक्टोबर रोजी दादरच्या शिवाजी मंदिरात रंगणार आहे.

कसा झाला घोषणेचा जन्म?

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार शिवसेनेतून फुटले. स्वत:चा वेगळा पक्ष स्थापन करून त्यांनी मूळ पक्षावर दावा केला. निवडणूक आयोगानं तो मान्य केला. हा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. शिंदे व त्यांच्या समर्थक आमदारांच्या बंडामागे आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप तेव्हापासून ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपनं शिंदेंच्या एकेका आमदाराला ५० कोटी दिल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे. त्यातूनच '५० खोके एकदम ओके' ही घोषणा जन्माला आली होती. ही घोषणा प्रचंड लोकप्रिय ठरली. त्याच लोकप्रियतेचा वापर नाटकासाठी करून घेण्यात आला आहे.

हे नाटक अराजकीय!

नाटकाचे निर्माते अशोक हर्ष यांनी हे नाटक अराजकीय असल्याचा दावा केला असला तरी राजकीय घडामोडींवर भाष्य केल्याचं मान्य केलं आहे. 'आम्ही लोकनाट्य प्रकाराचा वापर केला आहे. या नाटकात कोणाचंही नाव नसलं तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर विनोदी भाष्य करण्यात आलं आहे.

सेन्सॉर बोर्डाच्या सुचनेनुसार बदल

'काल्पनिक टिंगरपुरी साम्राज्यावर आधारित हे नाटक एक राजा, राणी, त्यांचा प्रधान आणि त्यांच्या निर्णयांचा राज्यावर होणारा परिणाम याभोवती फिरतं. राज्य सेन्सॉर बोर्डाच्या निर्देशानुसार यात काही बदल करण्यात आल्याची माहिती नाटकाचे लेखक जयवंत भालेकर यांनी दिली.

राजकीय भाष्य असलेले चित्रपट, नाटकं, गाण्यांचा प्रचारासाठी वापर करण्याची पद्धत नवी नाही. २०१४ च्या निवडणुकांपासून ती अधिकच वापरली जात आहे. जून २०२२ मध्ये शिवसेना फुटण्याच्या एक महिना आधी 'धर्मवीर' नावाचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शक शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात दिघे यांचे वैचारिक आणि राजकीय वारसदार म्हणून शिंदे यांना पुढं करण्यात आलं होतं.

आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे समर्थकांनी 'धर्मवीर २' हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात शिंदे यांना शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते म्हणून दाखवण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांच्यापासून फारकत घेण्याचा त्यांचा निर्णय चित्रपटाच्या माध्यमातून योग्य ठरविण्यात आला आहे.

‘विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाशी तुलना

गेल्याच महिन्यात ज्येष्ठ रंगकर्मी अशोक समेळ यांनी मुख्यमंत्र्यांचा आणखी एक बायोपिक असलेल्या 'माला कही तारी सांगायचा आहे एकनाथ संभाजी शिंदे' या मराठी नाटकाची घोषणा केली. आता '५० खोके एकदम ओके'मुळं निवडणूक प्रचाराला आणखी एक रंग चढणार आहे. या संपूर्ण नाटकाची धुरा सांभाळणारे दीपक गोडबोले यांनी या नाटकाची तुलना 'विच्छा माझी पुरी करा' या दादा कोंडके यांच्या गाजलेल्या लोकनाट्याशी केली आहे.

ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वैमनस्यावर हे राजकीय भाष्य आहे का, यावरही गोडबोले यांनी उत्तर दिलं. 'आमच्या नाटकात '५० खोके' म्हणजे काय आणि त्या खोकेतून काय निघतं,' हे पाहून प्रेक्षक चकीत होतील, असं गोडबोले म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर