मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी; पण मराठी लोकांनी येऊ नये, महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 05, 2024 07:16 PM IST

Woman HR LinkedIn Post : नोकरीची संधी महाराष्ट्रात आणि तीही मुंबईत असून कंपनीच्याHRकडून मराठी माणसाला डावललं गेल्यानं सर्वानाच धक्का बसला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप
महिला HR च्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप

HR LinkedIn Post : राज्यातील उद्योग गुजरातला पळवून नेल्याची मुद्दा लोकसभेच्या प्रचारात चांगलात गाजत असताना आता महाराष्ट्रात मराठी तरुण-तरुणींनाच नोकरी नाकारली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईतील गिरगावमध्ये नोकरीची संधी आहे मात्र मराठी लोकांनी येथे अर्ज करू नयेत, असा सरळ-सरळ उल्लेख असल्याने नोकरीच्या या जाहीरातीने मोठा वाद उफाळला आहे. वाद वाढताना पाहून महिला एचआरने आपली लिंक्डइन पोस्ट डिलीट केली तसेच कंपनीनेही आपला माफीनामा जाहीर केला आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. एका कंपनीच्या महिला HR नं लिंक्डइन प्रोफाईलवर केलेल्या पोस्टमुळे हा वाद सुरु झाला आहे. पोस्ट करणारी महिला HR गुजरातची असून एक फ्रिलान्स रिक्रुटर आहे. तिने मुंबईतील गिरगावमधील एका कंपनीसाठी ग्राफिक डिझायनरच्या एका रिक्त पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कंपनी योग्य उमेदवारच्या शोधात आहे. मात्र या पदासाठी जाहिरात पोस्ट करताना तिने एका गोष्टीचा उल्लेख केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. नेटीझन्सनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

गुजरातच्या एका फ्रीलान्स एचआर रिक्रूटरने ग्राफिक डिझायनरच्या पदासाठी मुंबईत नोकरीची तिच्या लिंक्डइन प्रोफाईलवर एक जाहिरात शेअर केली होती. पण धक्कादायक बाब म्हणजे या जाहीरातीमध्ये तिने "येथे मराठी लोकांचे स्वागत नाही" (Marathi people are not welcome here ) असे लिहिले होते. या सगळ्या प्रकारामुळे नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या पोस्टमध्ये महिला एचआरने सांगितलं की कंपनी मुंबईत एका ग्राफिक डिझायनरच्या शोधात आहे. या पदासाठी उमेदवाराकडे कमीत कमी एक वर्ष किंवा त्याहून अधिक कामाचा अनुभव हवा. त्यानंतर कंपनीला उमेदवाराकडून कोणत्या कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, याची माहिती दिली आहे. त्यात सर्वात पहिली अट होती की, मराठी माणसाला येथे अर्ज करू शकत नाही, किंवा येथे मराठी लोकांचे स्वागत नाही.

नोकरीची संधी महाराष्ट्रात आणि तीही मुंबईत असून कंपनीच्या HR कडून मराठी माणसाला डावललं गेल्यानं सर्वानाच धक्का बसला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एक्स अकाऊंटवरून नेटकऱ्यांनी महिला एचआरच्या पोस्टचा स्क्रिनशॉट शेअर करत तिला ट्रोल केले आहहे. त्यानंतर तिने आपली लिंक्डइनवरील पोस्ट डिलीट केली. तिच्या प्रोफाइलवरून ही वादग्रस्त पोस्ट काढून टाकल्यानंतरही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करणं थांबवलं नाही.

या प्रकाराचं गांभीर्य ओळखून महिला एचआरने दुसरी एक पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, झाल्या प्रकाराबद्दल मी माफी मागते. काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक डिझायनरच्या जागेसाठी जाहिरात पोस्ट केली होती. मात्र त्यातील एका वाक्यामुळे अनेकांची मने दुखावली गेली आहेत. मी अशाप्रकारे कोणाविरुद्धही कोणत्याही भेदभावाचं समर्थन करत नाही. माझ्या नजर चुकीमुळे ती पोस्ट टाकली केली होती.

IPL_Entry_Point

विभाग