मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Marathi News 24 September Live:

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे(फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Marathi News 24 September Live: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडेना CBI ने केली अटक

Marathi News Live Updates: सीबीआयने अटक केल्यानंतर संजय पांडे यांना न्यायालयाने ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Mon, 26 Sep 202205:44 AM IST

Eknath Shinde :  नवरात्रोत्सवानिमित्त राज्य सरकार राबणार ‘सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान 

 शारदीय नवरात्रोत्सव आपल्या मातृभक्त संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. मातृशक्ती आणि स्त्री शक्तीचा जागर करण्याचा, तिच्या समोर नतमस्तक होण्याचा उत्सव आहे. या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आजपासून आपण "माता सुरक्षित तर घर सुरक्षित " हे विशेष अभियान राबविणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. ५ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात घरातील माता निरोगी रहावी, जागरूक रहावी व समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी असा उद्देश आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता, भगिनींनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. 

Mon, 26 Sep 202205:40 AM IST

Eknath Shinde : महाराष्ट्राच्या विकास, समृद्धीकरिता व्रतस्थ राहुया; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा

मुंबई  आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाकडून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकास, समृद्धीकरिता व्रतस्थ राहण्याची प्रेरणा घेऊया अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. या निमित्ताने आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारे "माता सुरक्षित तर घर सुरक्षित " हे विशेष अभियान यशस्वी करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.  

Sat, 24 Sep 202202:14 PM IST

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडेना CBI ने केली अटक

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी सीबीआयने अटक केली आहे. याआधी पांडे यांना ईडीने अटक केली होती. आता सीबीआयने अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एनएसई, फोन टॅपिंग प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे.

Sat, 24 Sep 202211:20 AM IST

Ashish Shelar: मुंबईत भाजप ३०० ठिकाणी साजरा करणार दांडिया, भोंडला आणि गरब्याचा उत्सव

गणेशोत्सवाप्रमाणेच यंदाचा नवरात्रोत्सव देखील भारतीय जनता पक्षातर्फे उत्साहात साजरा केला जाणार आहे. ४९ ठिकाणी थेट भाजपतर्फे गरबा, दांडिया आणि भोंडला याचं आयोजन केलं जाणार आहे. तसंच, भाजप पुरस्कृत २४२ मंडळे ३०० ठिकाणी "उदे ग अंबे उदे"चा नारा देत उत्सव साजरा करणार आहेत. भाजपच्या दांडिया उत्सवात अनेक कलाकरांची उपस्थिती असेल, अशी माहिती मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Sat, 24 Sep 202211:02 AM IST

Devendra Fadnavis: पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांना सोडणार नाही; फडणवीसांचा इशारा

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवरील कारवाईच्या निषेधार्थ काल पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या होत्या. त्या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र असो की भारतात, इथं पाकिस्तानचा जयघोष करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. त्यांच्यावर कारवाई होणारच, असं फडणवीसांनी बजावलं आहे.

Sat, 24 Sep 202206:00 AM IST

Ashish Shelar: मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे आज दुपारी दोन वाजता वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत. दसरा मेळाव्याच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर ते भाष्य करण्याची शक्यता आहे.

Sat, 24 Sep 202204:32 AM IST

NCP: सुप्रिया सुळे यांचा मॉर्फ केलेला फोटो शेअर केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचा शीतल म्हात्रे यांना कायदेशीर कारवाईचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसल्याचा एक फोटो शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी शेअर केला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. शीतल म्हात्रे यांनी फोटो मॉर्फ करून पोस्ट केला आहे. त्यातून सुप्रियाताईंची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतू स्पष्ट दिसत आहे. मुंबई पोलीस व सायबर पोलिसांनी यावर त्वरित कारवाई करावी. म्हात्रे यांनी सुप्रिया सुळेंची माफी मागून पोस्ट डिलीट करावी, अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे.

Sat, 24 Sep 202202:54 AM IST

Latur Earthquake : हासोरीत तो गूढ आवाज नव्हता, भूकंपच होता; जिल्हा प्रशासनाचं स्पष्टीकरण

Earthquake In Hasori Latur : गेल्या काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील हासोरी गावात भूगर्भातून गूढ आवाज आला होता. त्यानंतर गावकऱ्यांनी भूकंपाच्या भीतीनं घरातून बाहेर पळ काढला होता. सुरुवातीला हा भूकंप नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. परंतु आता त्यानंतर हासोरीतील ती घटना भूकंपच होता, असा खुलासा लातूरच्या जिल्हा प्रशासनानं केला आहे. त्यामुळं आता हासोरी गावातील लोकांच्या चिंता वाढल्या आहेत.

Sat, 24 Sep 202202:49 AM IST

Konkan Refinery : पेट्रोलियम मंत्र्यांची प्रकल्पाचा मंजुरी; कोकणात रिफायनरीचा मार्ग मोकळा

Oil Refinery In Konkan : नाणारमध्ये तेल रिफायनरीचा प्रकल्प रद्द झाल्यानंतर आता बारसू गावात हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्ली दौरा केला होता. त्यानंतर आता बारसू आणि सोलगावमध्ये रिफायनरी प्रोजेक्टला सुरू करण्यास केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता येत्या काही दिवसांत प्रकल्पाचं काम सुरू होण्याची शक्यता आहे.

Sat, 24 Sep 202201:44 AM IST

कऱ्हाटी येथील ग्राम बाल विकास केंद्राचे उद्घाटन

पुणे : जिल्हा कुपोषणमुक्ती करण्याच्यादृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याहस्ते बारामती तालुक्यातील कऱ्हाटी येथे ग्राम बाल विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना ग्रामीण २१ प्रकल्पातील ५३२ ग्राम बाल विकास केंद्रामध्ये ११६ सॅम बालके व ७७८ मॅम बालके असे एकूण ८९४ बालके दाखल करण्यात आलेली आहेत.

Sat, 24 Sep 202201:43 AM IST

माहिती अधिकार दिनी विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन

पुणे : दरवर्षी २८ सप्टेंबर हा दिवस 'माहिती अधिकार दिन' म्हणून साजरा करण्यात येत असून यादिवशी 'माहितीचा अधिकार' या विषयावर विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शालेय शिक्षण विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविदयालये, विदयापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये 'माहितीचा अधिकार' या विषयावर आधारित प्रश्नमंजुषा, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजित कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. 

Sat, 24 Sep 202201:42 AM IST

राष्ट्रीय कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी ‘जलसमृद्ध ग्रामपंचायत आणि स्वच्छ गाव’ या विषयावर चर्चा

पुणे : भारत सरकारचे ग्रामविकास व पंचायती राज मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी ‘जलसमृद्ध ग्रामपंचायत आणि स्वच्छ गाव’ या विषयावर चर्चा करण्यात आली.

Sat, 24 Sep 202201:36 AM IST

Congress National President Election  : काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु

काँग्रेस अध्यक्षपदासाठी आज पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सध्या दोन नाव चर्चेत आघाडीवर आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 30 सप्टेंबरपर्यंत सुरु असेल.

Sat, 24 Sep 202201:33 AM IST

Eknath Khadse : एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार? राजकीय वर्तुळात चर्चा

एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे यांनी काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे सांगत भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. खडसे हे भाजप मध्ये जाणार असल्याची शक्यताही पाटील यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे खडसे हे खरचं भाजप मध्ये जाणार का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.