मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Marathi News 20 September Live News

Uddhav Thackeray

Marathi News 20 September Live : दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरे घेणार जाहीर मेळावा

Marathi News Live Updates: दसरा मेळाव्याआधीच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईतील गटप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. शिंदे गटाच्या बंडानंतरचा हा पहिलाच जाहीर मेळावा आहे.

Tue, 20 Sep 202211:59 AM IST

Nana Patole: राज्यातील १७५ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचा विजय; नाना पटोले यांचा दावा

राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत भारतीय जनता पक्ष खोटी माहिती देऊन विजयाचा दावा करत आहे, तो चुकीचा आहे. काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले असून काँग्रेस पक्षाला १७५ ग्रामपंचायतींमध्ये घवघवीत विजय मिळाला आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Tue, 20 Sep 202211:53 AM IST

Uddhav Thackeray : दसरा मेळाव्याआधीच उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

 दसरा मेळाव्याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईतील गटप्रमुखांना मार्गदर्शन करणार आहेत. शिंदे गटाच्या बंडानंतरचा हा पहिलाच जाहीर मेळावा आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतात, याकडं सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यांपुढं ठेवून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

Tue, 20 Sep 202210:26 AM IST

Narayan Rane: न्यायव्यवस्थेने सत्तेचा माज उतरवला; 'अधीश' बंगल्याच्या प्रकरणात शिवसेनेचा नारायण राणे यांना टोला

नारायण राणे यांच्या बंगल्याचा बेकायदेशीर भाग तोडण्याचा तसेच त्यांना १० लाख रुपये दंड जमा करण्याच्या आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. या निर्णयाचं शिवसेनेनं स्वागत केलं आहे. थर्माकोलचा हातोडा घेऊन गावागावांत फिरणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आता खरा हातोडा घेऊन तो राणेंच्या बंगल्यावर मारावा, असं आव्हान शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी दिलं आहे.

Tue, 20 Sep 202208:43 AM IST

Maratha Reservation: चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती

मराठा आरक्षणाबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. या समितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, बंदरे मंत्री दादा भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे. ही समिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती तसेच इतर संलग्न बाबींबाबत अहवालातील शिफारशींवर वैधानिक कार्यवाही करेल.

Tue, 20 Sep 202205:45 AM IST

Noida Wall Collapse: नोएडात भिंत कोसळून चौघांचा मृत्यू; ९ जण जखमी

नोएडातील सेक्टर २१ मध्ये मंगळवारी एक भिंत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. तर या दुर्घटनेतून ९ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. अद्याप ढिगारा काढण्याचे काम सुरू असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.

Tue, 20 Sep 202205:14 AM IST

Coronavirus: देशात मागील २४ तासांत ४,०४३ नवे करोना रुग्ण

मागील २४ तासांत देशभरात ४,०४३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर ४,६७६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या ४७,३७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दैनंदिन संसर्गाचा दर १.३७ टक्के आहे. 

Tue, 20 Sep 202204:01 AM IST

Share Market: शेअर बाजाराचा चढता क्रम; सेन्सेक्स ६०० हून अधिक अंकांनी वधारला

शेअर बाजार पुन्हा एकदा सकारात्मक वातावरण दिसत असून सेन्सेक्स ६०० हून अधिक अंकांनी वधारला आहे. तर, निफ्टी जवळपास २०० अंकांनी वाढून ट्रेड करत आहे. 

Tue, 20 Sep 202203:42 AM IST

Road Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

Accident on mumbai ahmedabad highway : अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काही दिवसांपूर्वीच झालेल्या कार अपघातात प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता या महामार्गावर पुन्हा एका कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

Tue, 20 Sep 202203:00 AM IST

ग्राहकांना फसवणुकी विरोधात तक्रार करण्याचे आवाहन

पुणे: वस्तूंचे वितरण करताना वजने व मापे संदर्भातील नियमांचे पालन न करणाऱ्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अस्थापनांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन वैध मापन शास्त्र यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे.  उप नियंत्रक वैध मापन शास्त्र पुणे कार्यालयामार्फत वेळोवेळी विविध मोहिमांचे आयोजन करून वजने व मापे यांची विहीत मुदतीत फेरपडताळणी व मुद्रांकन न करणाऱ्या तसेच आवेष्टित वस्तु नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर नियमानुसार कारवाई केली जाते.  पेट्रोल मापात कमी देणे, आवेष्टित वस्तुवरील मुळ छापील किंमत खाडाखोड करणे, छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे, गॅस सिलींडर वितरीत करणाऱ्या वितरक प्रतिनिधिकडे वजन काटा उपलब्ध नसणे अशा पद्धतीचे उल्लंघन आढळल्यास या विभागाकडुन कारवाई केली जाते.

Tue, 20 Sep 202202:36 AM IST

Earthquake : मॅक्सिकोत भीषण भूकंपाचे धक्के; इमारती हादरल्या, लोकांची धावपळ

Earthquake in mexico today : मॅक्सिकोत भूकंपाच्या भीषण धक्क्यांनी खळबळ उडाली आहे. यावेळी शहरातील इमारतींनाही हादरा बसला, भूकंप झाल्याचं लक्षात येताच नागरीक जीवाच्या आकांतानं सुरक्षितस्थळी पळत सुटले. मॅक्सिकोत झालेल्या या भूकंपाचा एक व्हिडिओही आता समोर आला आहे. या भूकंपाची तिव्रता किती होती, हे अजून समजू शकलेलं नाही.

Tue, 20 Sep 202202:16 AM IST

आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जीवन कार्याचा जागर या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

पुणे :  राजे उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुध्द लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते. १९ व्या शतकाच्या प्रारंभी ब्रिटीशांविरुध्द उठावाचे नेतृत्व केले होते. उमाजी नाईक यांनी हा उठाव इतिहासात रामोशींचा उठाव म्हणूनही प्रसिध्द आहे. आणि म्हणूनच उमाजी नाईक यांना आद्यक्रांतीकारक असेही म्हणतात. अशा थोर क्रांतीकारकाच्या जीवनकार्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २० सप्टेंबर, २०२२ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, डॉ.बाबासाहेब आंबडेकर चौक, सोमवार पेठ,पुणे येथे करण्यात आल्याची माहिती श्री.बिभीषण चवरे संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी दिली आहे.

Tue, 20 Sep 202202:08 AM IST

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान रंगणार आजपासून ट्वेन्टी-२० सामना

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ट्वेन्टी २० मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये हा सामना संध्याकाळी होणार आहे.

Tue, 20 Sep 202202:05 AM IST

Raj Thackeray : राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा; आज चंद्रपूरला जाणार

राज ठाकरे आज हे त्यांच्या विदर्भ दौऱ्यात चंद्रपूरला भेट देणार आहेत. या ठिकाणी ते दोन दिवस राहणार असून ते कार्यकर्त्यंशी संवाद साधणार आहेत. या सोबतच पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा देखील घेतला जाणार आहे.

Tue, 20 Sep 202201:56 AM IST

Maharashtra Rain: पावसाचा जोर ओसरला; राज्यात मराठवाड्यासह विदर्भात पावसाचा 'यलो' अलर्ट 

Maharashtra Rain: राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी आज हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.