Odisha Makar Sankranti Mela Stampede : मकर संक्रांतीच्या उत्साहावर विरजण घालणारी बातमी ओदिशामधून येत आहे. मकर संक्रातीच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन एका महिलेचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी जमावबंदी लागू केली आहे. ओडिशामधील कटक येथील सिंहनाथ मंदिर परिसरात मकर संक्रांतीच्या जत्रेवेळी शनिवारी ही चेंगराचेंगरी झाली.