मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आता इंजिनीअरिंगमध्ये मराठी सक्तीची, राज्याच्या शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

आता इंजिनीअरिंगमध्ये मराठी सक्तीची, राज्याच्या शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 28, 2024 04:38 PM IST

Marathi Compulsory in Engineering : इंजिनीअरिंग शाखेतही मराठी सक्तीची करण्याचे आदेश शिक्षण मंडळाने दिले आहेत.

सांकेतिक छायाचित्र
सांकेतिक छायाचित्र

राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातील इंजिनीअरिंग शाखेतही मराठी  सक्तीची करण्याचे आदेश शिक्षण मंडळाने दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच पहिली ते दहावीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली होती. त्यातच आता इंजिनिअरिंग शाखेतही मराठी सक्तीचा करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी वाशीत सुरू असलेल्या विश्व मराठी संमेलन २०२४ च्या व्यासपीठावरून ही घोषणा केली. यावेळी  मनसे अध्यक्ष राज ठाकरेदेखील उपस्थित होते. 

नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रावर तीन दिवसीय विश्व मराठी संमेलन होत आहे. या संमेलनाला राज ठाकरे यांनी नुकतीच हजेरी लावली. संमेलनात बोलताना मराठीच्या सद्यस्थितीवर त्यांनी भाष्य केलं. त्याचवेळी हिंदी भाषेबद्दलची वस्तुस्थिती देखील सांगितली.  मराठी माणूस जगभरात पसरलेला आहे. अनेक देशांमध्ये गेलेला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंद केलं पाहिजे. महाराष्ट्राचा विचार इतर लोकांमध्ये, देशांमध्ये जितका नेता येईल. आपली संस्कृती, परंपरा जितकी देशाबाहेर नेता येईल तितकं चांगलंच आहे. पण महाराष्ट्राकडंही आपण लक्ष दिलं पाहिजे,’ असं ते म्हणाले.

मराठी या विषयावर मी गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय. मी कडवट मराठी आहे. माझ्यावर तसे संस्कार झाले आहेत. मराठी विषयावर आंदोलन केली, केसेस घेतल्या, तुरुंगात गेलो. जून महिन्यात अमेरिकेत मला महाराष्ट्र मंडळानी निमंत्रित केले आहे. महाराष्ट्रातील मराठी शाळा बंद होत असताना अमेरिकेत मराठी शाळा उघडतात हे काय कमी आहे का ? असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला.

यानंतर आपल्या भाषणात केसरकर यांनी राज ठाकरेंची स्तुती केली. केसरकर म्हणाले की, राज ठाकरेंना सांगण्यास मला मनापासून आनंद होतोय की यावर्षीपासूनच आम्ही पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य केली आहे. त्याचबरोबर आता इंजीनिअरीगमध्येही मराठी सक्तीची करत असल्याची घोषणा करतो.

WhatsApp channel