Maratha Reservation : “सरकारचा भरलाय घडा; अजित पवार बाहेर पडा”, बारामतीमधून अजित पवारांवर वाढला दबाव; VIDEO
Maratha morcha baramati : “भरला सरकारच्या पापाचा घडा,अजितदादा बाहेर पडा”,अशा घोषणांनी आज बारामती शहर दणाणून गेले.बारामती शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.
जालना येथील मराठा आंदोलकावरील हल्ल्याचा निषेधार्थउपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती तालुक्यातील काटेवाडी या गावात ग्रामस्थ व सकल मराठा समाजाच्या मोर्चा काढण्यात आला होता. या मार्चात राज्य सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली त्याचबरोबर मोर्चात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फुल्या मारलेले फोटो झळकवले गेले. या मोर्चातअजित पवारांना उद्देशून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
ट्रेंडिंग न्यूज
“भरला सरकारच्या पापाचा घडा,अजितदादा बाहेर पडा”, अशा घोषणांनी आज बारामती शहर दणाणून गेले. बारामती शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी पवार यांना उद्देशून घोषणाबाजी करण्यात आली. “मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई केलीच पाहिजे, अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली.
कसब्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते भिगवण चौक असा सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. भिगवण चौकात या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. सरकारने मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा इशारा मराठा समाजाकडून दिला गेला. तसेच वेळप्रसंगी बारामतीतूनच आम्ही दोनशे कार्यकर्त्यांना निवडणुकीला उभे करु, असा इशारा देण्यात आला. आरक्षण मिळत नसेल तर अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडावे,अशी आक्रमक मागणी करण्यात आली.
सरकारचा भरलाय घडा अजित पवार सरकारच्या बाहेर पडा, अशा घोषणांनी बारामतीचा मोर्चा दणाणून गेला होता. मराठा बांधवाकडून आज बारामती बंदची हाक देण्यात आली व मोठा मोर्चा काढण्यात आला. बारामती व्यापारी महासंघातर्फे पुकारण्यात आलेल्या बारामती बंदला पूर्ण पाठिंबा देण्यात आला होता.