Manoj Jarange Patil on Election Result: राज्यात विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा काही ही परिणाम झाला नाही. जरांगे पाटील यांनी अरक्षणाच्या मुद्यावर सरकार विरोधी भूमिका घेतली होती. त्यांनी विधानसभेत मराठा उमेदवार देखील उतरवण्याची तयारी केली होती. मात्र, अखेरच्या क्षणी त्यांनी योग्य उमेदवाराला पाठिंबा द्या असे आवाहन केलं होतं. मात्र, मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालला नसल्याचं दिसलं आहे. मारठवड्यात महायुतीचे बहुतांश उमेदवार निवडून आले आहेत. मराठवाड्यात भाजपला २० पैकी १९, शिवसेनेने १६ पैकी १३ तर राष्ट्रवादीने ९ पैकी ८ जागांवर विजय मिळवला. दरम्यान, या निवडणुका नंतर मनोज जरांगे यांनी निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सरकारनं आता तातडीनं आरक्षण द्यावं असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षण आता लवकर द्यायचं, बेईमानी करायची नाही. मी आणि मराठा समाज मैदानातच नव्हतो. सरकारला जाहीरपणाने सांगतो मराठा आरक्षण द्यायचं नसेल, तर पुन्हा छाताडावर बसणार. सामूहिक आमरण उपोषणाला बसणार. आम्ही विधानसभेत कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नव्हता. मी मराठा समाजाला बंधनमुक्त केले होतं. त्यांना ज्यांना मतदान करायचं होतं त्यांनी त्यांना मतदान केलं. त्यामुळे महायुती सरकार निवडून येण्यात मराठा समाजाचाही मोलाचा वाटा देखील आहे. मराठा समाज सर्व पक्षात विखुरलेला असून त्यांनी पूर्ण ताकदीने काम केलंन आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार आल्याने त्यांना शुभेच्छा. पण आता, त्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे. त्यामुळे जर आरक्षण नाही मिळालं तर सरकारला गुडघ्यावर टेकवणार. पुन्हा उपोषण सुरू करणार असा इशारा जरांगे पाटील यांनी नव्या सरकारला दिला आहे. जरांगे पाटील म्हणाले, एका जातीवर लढणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही निवडणुकीतून बाजूला झालो. त्यामुळें सत्ता कुणाचाही आली तरी आम्हाला संघर्ष करावा लागणारच. त्यामुळं विजायामुळं हुरळून जायचं नाही व मराठ्यांना छेडाय नाही, असे देखील जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पाटील म्हणले, सत्तेत आले म्हणून दादागिरी करायची नाही. ही दादागिरी मराठ्यांपुढे चालणार नाही. मराठ्यांना मणगट लावायचं काम करायचं नाही. मैदानात असतो तर धुरळा वाजवला असता असंही जरांगे पाटील म्हणाले.