Gram Panchayat Election : परभणीत ‘या’ कारणामुळे सर्वच उमेदवारांनी मागे घेतले अर्ज.. निवडणूकच रद्द होण्याची नामुष्की
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gram Panchayat Election : परभणीत ‘या’ कारणामुळे सर्वच उमेदवारांनी मागे घेतले अर्ज.. निवडणूकच रद्द होण्याची नामुष्की

Gram Panchayat Election : परभणीत ‘या’ कारणामुळे सर्वच उमेदवारांनी मागे घेतले अर्ज.. निवडणूकच रद्द होण्याची नामुष्की

Oct 25, 2023 06:16 PM IST

Gram Panchayat Election : जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतल्यानं परभणीत दोन ठिकाणच्या निवडणुका रद्द होण्याच्या मार्गावर आहेत.

Gram Panchayat Election
Gram Panchayat Election

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी संघर्षकर्ते मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्यास सुरूवात झाली असून याचा फटका आता ग्रामपंचायत निवडणुकांनाही (Gram Panchayat Election) बसत आहे. परभणीतील जिल्ह्यातील वझुर गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आणि सरपंचपदासाठी दाखल करण्यात आलेले सर्वच अर्ज मागे घेण्यात आले आहेत. त्यामुळे या गावची निवडणूक प्रक्रियाच रद्द होण्याच्या मार्गावर आहे.

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील वझुर ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली आहे. सरपंच आणि ११ ग्राम पंचायत सदस्य अशा १२ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. १२ जागांसाठी ३४ इच्छुकांनी अर्ज केले असून यातील ३ अर्ज थेट सरपंचपदासाठी आहेत. मात्र जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत निवडणूक नाही असा निर्धार करत अर्ज दाखल केलेल्या सर्वच इच्छुकांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.

त्याचबरोबर पालम तालुक्यातील चाटोरी ग्रामपंचायतमध्ये एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. याठिकाणी चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चारही जणांनी होती. तिथेही चार जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र या चारही जणांनी आज आपले अर्ज मागे घेतले. मराठा आरक्षणासाठी गावकऱ्यांनी एकजुट दाखवली आहे. त्यामुळे आता या दोन्ही ठिकाणच्या निवडणूक आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे.

मनोज जरांगे पाटील यांनीआजपासून पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांना राज्यभरातून पाठिंबा वाढत आहे. त्यांच्या आवाहनानंतर पंढरपुरात सर्वपक्षीय आमदार, खासदार, मंत्री आणि राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षण मिळाल्यावरच सर्वांना विठ्ठल दर्शनासाठी प्रवेश मिळेल. विविध पक्षांच्या मराठा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देण्यासही सुरुवात केली आहे.

Whats_app_banner