मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश, राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य?

Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला यश, राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 16, 2024 01:45 PM IST

Maratha Reservation: महाराष्ट्र सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याची माहिती समोर येत आहे.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil (HT_PRINT)

Maharashtra Government: मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला यश मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याची सुत्रांची माहिती आहे. यामुळे जरांगे यांचे आंदोलन लवकरच संपण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. या भेटीत मनोज जरांगे पाटील यांना आरक्षणासंदर्भातील ड्राफ्ट दाखवला जाईल. त्यानंतर जीआर काढण्यात येईल, अशी माहिती आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत २६ जानेवारीपासून आंदोलन करण्याची घोषणा केली होती. परंतु, यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची सगेसोयऱ्यांना आरक्षण देण्याची मागणी मान्य झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

एका वृत्तवाहिनीने राज्य सरकारमधील मंत्र्याच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, "मनोज जरांगे यांनी २० जानेवारीला मुंबईकडे कूच करण्याची हाक दिली. मात्र, त्यांना मुंबईत येण्याची वेळच येणार नाही, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत."

सग्या सोयऱ्यांना लाभ देण्यासाठी कायदा करावा, यासाठी १९ जानेवारीला विशेष अधिवेशन घ्या. तसेच २० तारखेच्या आत नोंदी सापडलेल्या ५४ लाख मराठ्यांसह नातेवाईकांना तातडीने कुणबी प्रमाणपत्र द्या. याशिवाय, ग्रामपंचायत कार्यालयात नोंदी सापडलेल्या लोकांची यादी लावण्यात यावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती.

WhatsApp channel