मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange : ‘मारण्याचा प्रयोग केला तर…’; मनोज जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा

Manoj Jarange : ‘मारण्याचा प्रयोग केला तर…’; मनोज जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 23, 2024 06:43 PM IST

Manoj Jarange Warn state government : मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता खुला राहणार नाही,त्याचबरोबर हेही चॅलेंज बघायचं असेल तर बघा,असा थेट इशारा जरांगे यांनी दिला आहे.

manoj jarange
manoj jarange

मराठा आंदोलनाचे संघर्षकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांदा आंदोलनाची घोषणा केली असून यावेळी हे आंदोलना मुंबईत होणार आहे. जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवली सराटी ते मुंबई असा पायी मोर्चा काढला आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे.  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत गंभीर इशारा देखील दिला आहे. 

मराठा आरक्षण यात्रा आज पुण्यात आली होती. उपोषण आंदोलनाला मुंबईकडे निघालेल्या जरांगेंनी सरकारला गंभीर इशारा देत म्हटले की, आमच्या आंदोलनाला कुठलेही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका, मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातला एकही रस्ता खुला राहणार नाही, त्याचबरोबर हेही चॅलेंज बघायचं असेल तर बघा, असा थेट इशारा जरांगे यांनी दिला आहे.

जरांगे म्हणाले की, मराठा मराठा समाज एकत्रित आहे. मात्र अजूनही सरकारने हे गांभीर्याने घेतले नाही. आरक्षण मिळालं तरी मराठा समाजापुढं अनेक प्रश्न आहेत. तसेच, मारण्याचा प्रयोग केला तर महाराष्ट्रातील एकही रस्ता वर्षांनुवर्ष खुला राहणार नाही,  हेही चॅलेंज बघायचं असेल तर बघावे. मराठ्यांची दिशा आणि मराठ्यांचे वार कुठल्या दिशेने आहे हे सरकारला कळत नाही. सत्तेचा राग डोक्यात ठेवून काम करत असाल, तर सत्ता येत असते आणि जात असते. पण मराठे कायमचे आयुष्यातून राजकीय सुपडासाप करतील, असा सरकारमधील नेत्यांना जरांगे यांनी इशारा दिला आहे. 

अंतरवालीत काही चूक नसताना सरकारने लाठीमारचा प्रयोग केला. त्यामुळे आम्ही यावेळी सावध आहोत. आरक्षण असलेला आणि आरक्षण नसलेला मराठा एकत्र आला नाही. 

मुंबईकरांनी तांब्या भरून पाणी द्यावं अशी अपेक्षा आम्हाला आहे. समाजासाठी थोडा त्रास सहन करावा, सर्व जाती धर्मातील मुंबईच्या लोकांना हात जोडून अवाहन आहे. 

WhatsApp channel