Manoj Jarange : मनोज जरांगे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार! विधानसभेच्या २८८ जागा लढवणार; सर्वात मोठी घोषणा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange : मनोज जरांगे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार! विधानसभेच्या २८८ जागा लढवणार; सर्वात मोठी घोषणा

Manoj Jarange : मनोज जरांगे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार! विधानसभेच्या २८८ जागा लढवणार; सर्वात मोठी घोषणा

Apr 28, 2024 11:56 PM IST

Manoj Jarange vidhan Sabha Election: ६ जूनपर्यंत सरकारने मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिले नाही तर विधानसभेला २८८ जागांवर उमेदवार उभे केले जातील तसेच मी स्वत: निवडणूक लढवणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार!
मनोज जरांगे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार!

manoj jarange will contest vidhan sabha elections : मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला सगेसोयऱ्यांबाबत अल्टिमेटम दिला आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून कोणालाही विनंती करणार नसून आरक्षण मिळालं नाही तर थेट विधानसभेच्या आखाड्यात उतरणारच, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर टीका केली आहे.

जरांगे पाटील म्हणाले, जर मराठा आरक्षणासाठी सगेसोयऱ्याची अंमलबजावणी केली नाही, तर मराठा समाज यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उभा राहणार आहे. मराठा समाज२८८जागांवर उमेदवार उभे करणार असूनमी स्वत: देखील निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. आमचा कोणत्याही पक्षाला विरोध नाही. केवळ आम्हाला आमचं हक्काचं आरक्षण हवं आहे. जे सगेसोयऱेला विरोध करत आहेत त्या पक्षाचा कार्यक्रम केल्याशिवाय मराठा समाज शांत राहणार नाही,असा हल्लाबोलही जरांगे यांनी केला आहे.

जरागे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्याकडे आरक्षणासंदर्भात विनंती केली होती. त्यांच्या कानावर घातलं होतं की, तुमचा माणूस आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करून खोट्या केसेस अंगावर टाकतोय, हे थांबवा. मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण द्या. अशी मागणी आतापर्यंत दोनदा केली आहे. मी सुद्धा क्षत्रीय मराठा आहे,आता पुन्हा विनंती करणार नाही. मराठ्यांना६जूनपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आणि महाराष्ट्रातील सर्व २८८ जागा लढवणार, असा इशारा जरांगे पाटलांनी सर्वच राजकीय पक्षांना दिला आहे.

जरांगे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र अखेर आम्ही लोकसभा न लढण्याचा निर्णय घेतला. लोकसभेला जरी उमेदवार उभा केला नसला तरीही आम्ही विधानसभेला सर्व जागांवर उमेदवार देणार आहोत. आम्ही मागील एक महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मराठा समाजाच्या एकीची सरकारने धास्ती घेतली असून राज्यात ४८ जागांसाठी लोकसभा निवडणुका ४ टप्प्यात घेतली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला प्रचार करून अन्य नेत्यांचाही प्रचार करावा लागत आहे.

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते नकतंच रूग्णालयातून थेट बीड येथील एका अखंड हरिनाम नारळी सप्ताहाच्या निमित्ताने दाखल झाले होते.त्यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील तेथे आल्या. यावेळी मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर दिसून आले. यावेळी पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर