मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange Mumbai Morcha : मराठा आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती नको, शिक्षण १०० टक्के मोफत करा - मनोज जरांगे

Manoj Jarange Mumbai Morcha : मराठा आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती नको, शिक्षण १०० टक्के मोफत करा - मनोज जरांगे

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 26, 2024 03:31 PM IST

Manoj Jarange Patil on Maratha Morcha : जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीत तोपर्यंत भरती करायची नाही. जर भरती करायचीच असेल तर आमच्या जागा सोडून भरती करा अशी मागणी जरांगे यांनी केली.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : आरक्षणाच्या मागणीसाठी आजवरचा अतिविराट मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेनं निघालेला मराठ्यांचा मोर्चा सध्या नवी मुंबईत थांबला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा मुंबईत येत आहे. राज्य सरकारकडून मोर्चाच्या मागणीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यानुसार सातत्यानं सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या संपर्कात होतं. सरकारने आज पाच अध्यादेश काढले असून जरांगेंनी जाहीर सभेत ते वाचून दाखवले.

जरांगे म्हणाले की सरकारने ५७ लाख नोंदी सापडल्याचं सांगितलं आहे. आता त्यापैकी ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र वितरित केलं असल्याचं सरकारने सांगितले आहे. उर्वरित सर्वांनाही प्रमाणपत्र देऊ असे शासनाने सांगितले. ज्या ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र दिली आहेत, त्याची यादी मागितली आहे.

मराठ्यांचा मोर्चा नवी मुंबईत येऊन धडकल्यानंतर सरकारच्या हालचाली वाढल्या होत्या. अखेर आज सकाळी थेट शासन निर्णय (GR) घेऊन सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलं. हे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली. हा जीआर नेमका काय आहे हे मनोज जरांगे यांनी आंदोलकांपुढं सांगितलं.

सरसकट मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. आतापर्यंत समाजाची फसवणूक झाली पण इथून पुढं तसं होऊ देणार नाही, असा निर्धार करत मनोज जरांगे पाटील मुंबईने दिशेने निघाले आहेत. मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर नवी मुंबईत पोहोचला आहे. 

मनोज जरांगे यांच्या भाषणातील मुद्दे -

 • सरकारने ५७ लाख नोंदी सापडल्याचं सांगितलं जात आहे. आता त्यापैकी ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र वितरित केलं असल्याचं सरकारने सांगितले आहे. उर्वरित सर्वांनाही प्रमाणपत्र देऊ असे शासनाने सांगितले. ज्या ३७ लाख लोकांना प्रमाणपत्र दिली आहेत, त्याची यादी मागितली आहे.
 • आंतवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घ्यावी अशी मागणी केली होती. त्यावर गृहविभागाकडून तसे निर्देश दिल्याचे आपल्याला सांगितलं. पण त्यासंबंधी आपल्याला पत्र दिलं नाही. त्यामुळे ते पत्र मिळावं
 • मराठा समाजाच्या ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या असून त्यांना प्रमाणपत्र मिळण्यास काही अडचण नाही. 
 • सापडलेल्या नोंदी ग्रामपंचायतींमध्ये लावण्यास सुरुवात झाली आहे.
 • ५४ लाख नोदींचे प्रमाणपत्र देण्यासाठी शिबीर घेण्यास सुरुवात. एका नोंदीवर १५० ते २५० लोकांना लाभ मिळू शकतो.
 • शिंदे समितीने काम थांबवायला नको, त्यांनी नोंदी शोधत राहिले पाहिजे.
 • सरकारकडून ३७ लाख प्रमाणपत्रांचे वाटप, त्याचा डाटा आपल्याला मिळायला पाहिजे.
 • अंतरवली सराटीसह सर्व गुन्हे मागे घ्यावेत.
 • शिंदे समितीची मुदत १ वर्षाने वाढवा. तसेच सगेसोयऱ्यांबाबत अध्यादेश काढा.
 • आरक्षण मिळेपर्यंत १०० टक्के शिक्षण मोफत करा.
 • जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीत तोपर्यंत भरती करायची नाही. जर भरती करायचीच असेल तर आमच्या जागा सोडून भरती करा अशी मागणी जरांगे यांनी केली. त्यासाठी शासन निर्णय काढावा.
 • आझाद मैदानाकडे जात नाही, मात्र सग्यासोयऱ्यांबाबत अध्यादेश काढेपर्यंत वाशीतच थांबणार - जरांगे

 

 

WhatsApp channel