Maratha Reservation: महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्दाने चांगलाच पेटला घेतला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकार देखील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार असल्याने ओबीसी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संघटनांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. तसेच या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करणाऱ्या तरुणाच्या अंगावर तेल ओतून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी मराठा समाजातील पाच कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रताप कांचन असे फिर्यादी तरुणाचे नाव आहे. त्याने मराठा समजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शवला. मात्र, यामुळे राग अनावर झाल्याने मराठा समाजातील कार्यकर्ते राम जाधव, योगेश पवार, रतिकांत पाटील, ओंकार लोखंडे, किरण वाघमारे यांनी प्रतापच्या अंगावर तेल ओतून त्याला चोप दिला. एवढेच नव्हेतर त्याच्या खिशातील पैसे काढून त्याची बदनामी केली.याप्रकरणी प्रताने या पाच जणांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान, राम जाधव, योगेश पवार, रतिकांत पाटील, ओंकार लोखंडे, किरण वाघमारे यांच्याविरोधात भादवि कलम ३०७, १४३, १४७, १४९, ३२७, ५२७, ५००, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३० ऑक्टोबर २०२३ रोजी घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मराठा समाज हा पूर्वीपासूनच ओबीसी होता. ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे गेल्या ४० वर्षांमध्ये हे आरक्षण आम्हाला मिळाले नव्हते. आम्ही ओबीसी समाजाच्या वाट्याचे आरक्षण मागत नाही, तर आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास नेमका कोणत्या कारणामुळे विरोध केला जात आहे? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
संबंधित बातम्या