मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange Patil : गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, मनोज जरांगे यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

Manoj Jarange Patil : गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, मनोज जरांगे यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jan 27, 2024 10:48 AM IST

Manoj Jarange Patil appeals Eknath Shinde : राज्य सरकारनं आम्हाला जो शब्द दिलाय, तो पाळावा. विजयी गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केलं.

Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil appeals Eknath Shinde : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी कालपासून सुरू केलेलं उपोषण आज मागे घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी उपोषण सोडलं. मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगे यांना विजयाचा गुलाल लावला. त्यानंतर त्यांनी सर्व उपस्थितांना संबोधित केलं. सरकारनं काही दगाफटका केला तर पुन्हा मुंबईत येणार, असं जरांगे यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.

'गेली साडेचार महिने हा संघर्ष सुरू आहे. मराठा बांधवांनी मोठा संघर्ष केला. उपाशी-तापाशी झोपावं लागलं, पण एकानंही तक्रार केली नाही. ३०० पेक्षाही जास्त तरुणांनी आत्महत्या केल्यात. कुटुंब उघड्यावर पडली आहेत. मायभगिणींचं कुंकू पुसलं गेलंय. त्यांची स्वप्नं साकार करण्याची जबाबदारी आमच्या खांद्यावर होती. विनायक मेटे, अण्णासाहेब जावळे, अण्णासाहेब पाटील यांचं बलिदान व्यर्थ जाऊ न देण्याची जबाबदारी होती, असं जरांगे म्हणाले. 

Manoj Jarange Patil : सरकारनं काय-काय मान्य केलं? मनोज जरांगे यांनी स्वत: महाराष्ट्राला सांगितलं!

'राज्य सरकारनं लवकरात लवकर शिबिरं लावावीत. ज्यांची कुणबी नोंद मिळाली, त्या मराठा बांधवांच्या सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं, याचा पुनरुच्चार जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर केला. 

गुलालाचा अपमान होऊ देऊ नका!

'सग्यासोयऱ्यांचं जे राजपत्र काढलंय. त्यात सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा उल्लेख आहे. त्यामुळं हा विजयी गुलाल उधळला गेलाय. या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केलं.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश! सरकारनं अध्यादेश काढला! नवी मुंबईतच आज मोर्चाची सांगता

मराठा-ओबीसींमध्ये भांडण होऊ देणार नाही!

मराठा-ओबीसींमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न काही नमुने करत आहेत. आम्ही आजपर्यंत कधी गावात मराठे आणि ओबीसींचं भांडण होऊ दिलं नाही, होऊ देणार नाही. गावात आम्ही गुण्यागोविंदानं राहतो. आम्ही अर्ध-अर्ध पेट्रोल टाकून गाडी चालवतो. तुम्ही मोठे नेते आहात. आम्हाला तुमच्याबद्दल आदर आहे. माणूस म्हणून आमचा तुम्हाला विरोध नाही. आमच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना दिला.

WhatsApp channel