अंतरवली सराटी येथे लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठी माहिती समोर
Devendrafadanvis : जालन्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीहल्ला प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्दोष असल्याचा महत्वाचा खुलासा समोर आलाआहे.
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे आंदोलकांवर लाठीचार्ज (Antarwali Sarathi Lathi charge) प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. मराठा आंदोलकांवर झालेल्या या लाठीहल्ला प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे निर्दोष असल्याचा महत्वाचा खुलासा समोर आला आहे. माहिती अधिकारातून ही बाब स्पष्ट झाली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
जालन्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने झाला नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे आहे. जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी ही माहिती दिली आहे.
१ सप्टेंबर रोजी जालन्यामध्ये मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये हा संघर्ष झाला होता. मराठा आंदोलकांवरील लाठीचार्ज प्रकरणानंतर राज्यभरात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. ज्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती.
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलक व पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष झाला होता. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर केलेल्या लाठीचार्जनंतर पोलीस कर्मचारी व वाहनांवर जोरदार दगडफेकही झाली होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्जचा आदेश दिल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. याप्रकरणी आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
आंदोलकांवर लाठीहल्ला करण्याचे आदेश गृहमंत्री फडणवीस यांनी दिले नसल्याचे समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले नव्हते.. असं माहिती अधिकारातून समोर आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी आरटीआय अर्ज केला होता.
या अर्जाला दिलेल्या उत्तरात आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश मिळाले नव्हते, अशी माहिती जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर सी शेख यांनी दिली आहे.