मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मराठा आरक्षणाचे भूत पुन्हा मानगुटीवर बसणार? तरुणाचा मंत्रालयाच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

मराठा आरक्षणाचे भूत पुन्हा मानगुटीवर बसणार? तरुणाचा मंत्रालयाच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 23, 2022 08:06 PM IST

मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha)कार्यकर्त्यांने मराठा आरक्षणाची मागणी करतमंत्रालयाच्या छतावरचढून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ माजली होती.

तरुणाचा मंत्रालयाच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न
तरुणाचा मंत्रालयाच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारचे पहिलेच अधिवेशन सुरू आहे. विधीमंडळाच्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी होत आहे. विधीमंडळाचे अधिवेशन (Monsoon Session Maharashtra) सुरू असतानाच मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) कार्यकर्त्यांने मराठा आरक्षणाची मागणी करत मंत्रालयाच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. युवराज चव्हाण असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. 

दरम्यान आज मंत्रालयासमोर उस्मानाबाद येथील एका शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सुभाष भानुदास देशमुख असं या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी दुपारी मंत्रालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून देशमुख यांनी पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मंत्रालय परिसरात तैनात असणाऱ्या पोलिसांनी त्याच्या वेळीच हस्तक्षेप केल्याने त्यांचा जीव वाचला. देशमुख यांना तातडीने गुरु तेगबहादूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

या घटनेवरून विरोधी पक्षाने सरकारला धारेवर धरले. जमिनीच्या वादातून सुभाष देशमुख यांनी जाळून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्यांचा हात भाजला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. 

या घटनेनंतर सायकाळच्या सुमारास मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याने मंत्रालयाच्या छतावर चढून उडी मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. सुरक्षा रक्षकांनी त्याला छतावरून खाली उतरले.

IPL_Entry_Point