Pune Railway Mega block : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून दौंड गुड्स यार्ड आणि दौंड कॉर्ड लाइनसाठी नॉन-इंटरलॉकिंग (एनआई) कामे आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (ईआई)च्या कामासाठी विशेष मेगा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील आठडव्यात अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड स्थानक महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. या ठिकाणी आजपासून विशेष ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे अनेक गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचा मार्ग हा वळवण्यात आला आहे. आज पनवेल-हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस, पुणे-बारामती-पुणे डेमू, दौंड-निजामाबाद डेमू, सोलापूर-दौंड-सोलापूर डेमू, पुणे-दौंड मेमू, दौंड-बारामती डेमू, पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस पुणे-दौंड-पुणे डेमू, या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तर उद्या ३० जुलैला हुजूर साहेब नांदेड- पनवेल एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर एक्स्प्रेस, सोलापूर-पुणे डेमू, पनवेल – हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, हडपसर-सोलापूर डेमू, दौंड-निजामाबाद डेमू, अमरावती-पुणे, सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, हडपसर-दौंड डेमू, बारामती-पुणे डेमू, पुणे-दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, पुणे-बारामती डेमू, पुणे -दौंड मेमू पैसेंजर, बारामती-दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, पुणे-हरंगुल-पुणे स्पेशल, दौंड-सोलापुर-दौंड डेमू या गाड्या रद्द करण्या आल्या आहेत.
तर ३१ जुलै रोजी सिकंदराबाद-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस,पनवेल-हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस, पुणे-सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, हडपसर-सोलापूर डेमू, पुणे-सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस,दौंड-निजामाबाद डेमू, सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, दौंड-हडपसर डेमू, बारामती-पुणे डेमू, पुणे-दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, बारामती-दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, पुणे-बारामती डेमू, पुणे-दौंड मेमू पैसेंजर, पुणे-दौंड-पुणे डेमू, पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस, सोलापूर-दौंड-सोलापूर डेमू या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच १ ऑगस्टला देखील सोलापूर-पुणे एक्स्प्रेस, पुणे- सिकंदराबाद-पुणे शताब्दी एक्स्प्रेस, पुणे-सोलापुर-पुणे एक्स्प्रेस, हडपसर-सोलापूर एक्स्प्रेस, दौंड-निजामाबाद डेमू, सोलापूर-पुणे डेमू एक्स्प्रेस, पुणे-अमरावती एक्स्प्रेस, पुणे-हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस, पनवेल-हुजूर साहेब नांदेड एक्स्प्रेस, पुणे-दौंड डेमू, दौंड -बारामती डेमू, दौंड-हडपसर डेमू, बारामती-पुणे डेमू, अमरावती-पुणे एक्स्प्रेस, पुणे-दौंड मेमू पैसेंजर, पुणे-बारामती डेमू, दौंड- पुणे डेमू, साईंनगर शिर्डी-दादर एक्स्प्रेस, बारामती-दौंड डेमू, दौंड-बारामती डेमू, पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस, सोलापूर-दौंड-सोलापूर डेमू एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या