मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Imtiyaz Jaleel : ‘महाराष्ट्रातील मंत्री कामं करण्यासाठी कमिशन घेतात’, इम्तियाज जलील यांचा आरोप

Imtiyaz Jaleel : ‘महाराष्ट्रातील मंत्री कामं करण्यासाठी कमिशन घेतात’, इम्तियाज जलील यांचा आरोप

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 13, 2023 09:16 PM IST

Imtiyaz Jaleel live : कर्नाटकातील निवडणुकीत कमिशनचा मुद्दा चांगला गाजला, त्यानंतर आता राज्यातील मंत्री देखील काम करण्यासाठी कमिशन घेत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

MIM MP Imtiyaz Jaleel
MIM MP Imtiyaz Jaleel (HT)

Imtiyaz Jaleel On Shinde Fadnavis Govt : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत ४० टक्के कमिशनचा मुद्दा गाजत असतानाच आता महाराष्ट्रातील मंत्री देखील विकासकामांसाठी कमिशन घेत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्र्यांवर कमिशनखोरीचे आरोप केले आहे. त्यामुळं आता राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर ४० टक्के कमिशन घेत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता, त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्री हे देखील कामांसाठी कमिशन घेत असल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक मंत्री काम करण्यासाठी २० टक्के कमिशन घेतात. राज्यातील सगळ्या मंत्र्यांचे पीए कोट्यवधी रुपये घेऊनच काम करत असल्याचा गौप्यस्फोट खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. राज्यातील कुठल्याही मंत्र्यांकडे गेलो तर त्याचा पीए पैसे घेतल्याशिवाय काम नसल्याचा आरोपही खासदार जलील यांनी केला आहे. त्यामुळं आता जलील यांच्या आरोपानंतर राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यावर ४० टक्के कमिशन घेत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपाचा धक्कादायक पराभव झाला आहे. त्यामुळं आता महाराष्ट्रातील मंत्र्यांवर कमिशनखोरीचा आरोप करण्यात आल्यानंतर वाद पेटण्याची शक्यता आहे. खासदार इम्तियाज यांच्या आरोपांनंतर सत्ताधारी शिवसेना-भाजपा आणि एमआयएममध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel