manusmriti shlok in Maharashtra Schools books : नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शालेय शिक्षणाच्या पुस्तकात 'एससीईआरटी'ने मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्थावावर आक्षेप, हरकती आणि सूचना देखील मागवण्यात आल्या आहे. दरम्यान, या निर्णयावरून आता वाद होण्याची चिन्हे आहेत. एनसीईआरटीईच्या या प्रस्तावाला राष्ट्रवाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला असून या विरोधात ते आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनूस्मृतीची होळी केली होती, त्या महाड येथे आव्हाड देखील मनुस्मृतीची होळी करून ते सरकारच्या या निर्णयाचा निषेध करणार आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शालेय पाठ्यपुस्तकात मनूस्मृतीतील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव एनसीआरईटीने दिला आहे. दरम्यान, या प्रस्तावाचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला होता. त्यांनी या निर्णयावर नापसंती देखील व्यक्त केली होती. दरम्यान, आता आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील या निर्णयाविरोधात आक्रमक झाले आहेत. शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी ते महाड येथे आंदोलन करणार आहे. महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीची होळी केली होती. त्याच ठिकाणी जितेंद्र आव्हाड हे जाणार असून या ठिकाणी ते देखील मनुस्मृतीच्या प्रतींची होळी करून सरकारचा निषेध करणार आहेत. सरकारच्या या निर्णया विरोधात एकत्र येण्याचे आवाहन देखील आव्हाड यांनी केले आहे.
मनुस्मृतीमधील तीन श्लोकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यावरून आता मोठा वाद होण्याची शक्यता आहे. मनुस्मृतीत स्त्रियांचे अधिकार नाकारण्यात आले आहे. या मनुस्मृतीमुळे ५ हजार वर्ष आपले पूर्वज हे त्रासाचे जीवन जंगले. आता हे सरकार ही मनुस्मृती पुन्हा एकदा आणणार असून ती शालेय अभ्यासक्रमात आणली जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या मनूस्मृतीची होळी करून स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार केला. त्याच ठिकाणी पुन्हा या मनूस्मृतीचे दहन करून सरकारचा निषेध करणार असल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहे.
जे लोक म्हणतात आम्हाला तुमचं संविधान मान्य नाही, आमचं संविधान म्हणजे मनुस्मृती. तेच लोक आता शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा घाट घालत आहेत. तुम्हाला आणि आम्हाला संविधान वाचवायचे आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२७ मध्ये मनुस्मृती दहन केले. तर १९५०मध्ये मध्ये संविधान लिहिले. बाबासाहेब आंबेडकरांच्या या आंदोलनाचे स्मरण करून सरकारच्या या निर्णया विरोधात लढणार असल्याचे देखील आव्हाड म्हणाले.