Manoj Jarange Shantata Rally: मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृतीसाठी आजपासून शांतता रॅली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange Shantata Rally: मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृतीसाठी आजपासून शांतता रॅली

Manoj Jarange Shantata Rally: मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृतीसाठी आजपासून शांतता रॅली

Jul 06, 2024 11:52 AM IST

Manoj Jarange Patil Shantata Rally : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी १३ जुलैपर्यंत सरकारला मुदत दिली आहे. दरम्यान, त्यापूर्वी त्यांनी शांतता रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. आज हिंगोलीतून या रॅलीला सुरुवात होणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांची मराठा मराठा आरक्षण जनजागृतीसाठी आजपासून शांतता रॅली
मनोज जरांगे पाटील यांची मराठा मराठा आरक्षण जनजागृतीसाठी आजपासून शांतता रॅली

Manoj Jarange Shantata Rally: मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आजपासून शांतता रॅली सुरु करणार आहे. या रॅलीची सुरुवात हिंगोलीतून आज होणार आहे. सगेसोयऱ्यांसह मराठा आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम असून या बाबत त्यांनी सरकारला १३ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. ही शांतता रॅली १३ जुलैपर्यंत चालणार असून यानंतर मनोज जरांगे त्यांच्या आंदोलनाची पुढची भूमिका स्पष्ट करणार आहे. सकाळी ११.३० च्या वेळी शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. हिंगोलीत या रॅलीसाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्याशी भेट घेऊन त्यांचाशी तब्बल २ तास चर्चा केली. दरम्यान, सगेसोयरे आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी या साठी सरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. त्या पूर्वी ते मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली काढणार आहे. ही रॅली आज हिंगोलीतून काढली जाणार आहे. ही रॅली संपूर्ण राज्यात काढली जाणार आहे.

मनोज जरांगे हे या रॅलीसाठी सकाळी समर्थकांसह हिंगोलीला रवाना झाले आहे. बळसोंड येथे त्यांचे ३० फुटांच्या गुलाबाच्या फुलांच्या हाराने स्वागत करण्यात येणार आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पोहोचल्यावर ते छत्रपती शिवरायांना अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करणार आहे. दुपारी ३ वाजता शांतता रॅली संपून मनोज जरांगे पाटील जाहीर भाषण करणार आहे. यानंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

या रॅलीला हिंगोलीच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा येथून सुरुवात होणार आहे. ही रॅली पोस्ट ऑफिस रोड मार्गे आखरे मेडिकल - खुराना पेट्रोल पंप चौक महात्मा गांधी चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, महात्मा गांधीजींचा पुतळा इंदिरा गांधी चौक इंदिरा गांधी चौक मार्गे जाणार आहे. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील भाषण करणार आहे.

८ जुलैला शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे. चार दिवसांचा हा दौरा राहणार आहे. त्यात मनोज जरांगे यांची हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी असलेल्या मागणीबाबत पुरावे शिंदे समिती गोळा करणार आहे. या समितीत ८ जण आहेत.

अशोक चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

मनोज जरांगे पाटील यांना शुक्रवारी अंतरवली सराटीत भाजपाचे राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण भेटले. त्यांच्या सोबत शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे देखील उपस्थित होते. अंतरवलीचे सरपंचं यांच्या घरी ही भेट झाली. दोन तास दोघांमद्धे चर्चा झाली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या