Thane Traffic change for Manoj Jarange Sabha : मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभरणारे मनोज जरांगे पाटील सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. काल पुण्यात आणि मुंबईत सभा झाल्यावर आज त्यांची तोफ ठाण्यात धडाडणार आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होणाऱ्या सभेसाठी वाहतुकीत आज मोठा बदल करण्यात आला आहे. अनेक रस्ते बंद करण्यात आले आहे. तर काही रस्ते वळवळण्यात आले आहेत. या सभेसाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गैरप्रकार टाळण्यासाठी सखल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाचा आयोजक कार्यकर्त्याना ओळखपत्र देण्यात येणार आहेत.
ठाण्यात होणाऱ्या मजोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी सकाळी ६ ते दुपारी १ पर्यंत हे वाहतूक बदल करण्यात आले आहे. या सभेला येतांना जरांगे पाटील हे खारेगाव टोलनाका, माजिवडा, नितीन कंपनी, ठाणे महापालिका मुख्यालय, अल्मेडा चौक, वंदना सिनेमा मार्ग, गजानन महाराज चौक, पु. ना. गाडगीळ चौक, मुस चौक, तलावपाली येथील छत्रपती शिवाजीमहाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून ते गडकरी रंगायतनमध्ये सभेसाठी येणार आहेत.
ठाण्यात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अनेक ठिकाणी बदल करण्यात आले आहे. डॉ. मुस चौक येथून गडकरी चौकाच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना डॉ. मुस चौकाजवळ प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येथील वाहतूक ही आनंद टॉवर येथे जांबली नाका, टेंभीनाका मार्गे वळवण्यात आली आहे.
डॉ. मुस चौक कडून गडकरी सर्कलकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना डॉ. मुस चौक येथे बंदी करण्यात आली आहे. येथील वाहने हे पर्यायी मार्ग असणारा डॉ. मूस चौक येथून सरळ टॉवर नाका टेंभी नाका मार्गे इच्छित स्थळी जातील. तर गडकरी सर्कल कडून डॉ. मुस चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गडकरी सर्कल येथे 'प्रवेश बंद' करण्यात आला असून येथील वाहने वाहने गडकरी येथून अल्मेडा चौक वंदना टी पॉईंट गजानन चौक तीन पेट्रोल पंप - हरिनिवास सर्कल या पर्यायी मार्गे इच्छित स्थळी जातील. न्यु इंग्लिश स्कूल समोरील गल्लीतून राम मारूती रोडकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना न्यु इंग्लिश स्कूल कट येथे 'प्रवेश बंद' करण्यात आला असून येथील वाहने बेडेकर हॉस्पिटल येथून राजमाता वडापाव या पर्यायी मार्गे इच्छित स्थळी जातील. पु. ना. गाडगीळ चौकातून तलावपाळी कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पु. ना. गाडगीळ चौक येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. येथील वाहने ही पर्यायी मार्ग असलेल्या राम मारूती रोड वरील येणारी व जाणारी वाहने श्रद्धा वडापाव, गजानन महाराज चौक, राजमाता वडापाव मार्गे इच्छित स्थळी जातील.
ठाण्यात आज जरांगे पाटील यांची सभा होणार असून त्यांचे ठीकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या स्वागतार्थ पुष्पवृष्टी करण्यासाठी तब्बल २५ जेसीबी तैनात करण्यात आले आहेत.