मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj Jarange Protest : संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद; संचारबंदीही लागू; एसटी फेऱ्याही राहणार बंद

Manoj Jarange Protest : संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद; संचारबंदीही लागू; एसटी फेऱ्याही राहणार बंद

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 26, 2024 11:40 AM IST

Manoj Jarange Protest : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या पार्श्वभमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून गैर प्रकार टाळण्यासाठी तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Internet Service Closed
Internet Service Closed (HT_PRINT)

Manoj Jarange Protest : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांनी मुंबईला देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर उपोषण करणार आहे. दरम्यान, ते पुन्हा अंतरवली सराटी येथे माघारी फिरले असून आज ते ५ वाजता त्यांची दिशा स्पष्ट करणार आहे. दरम्यान, आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर जालना, संभाजीनगर, बीड येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या सोबतच येथील इंटरनेट सेवा देखील बंद (Internet Service Closed) करण्यात आली आहे. तर जालना येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा देखील बंद ठेवण्यात आली आहे.

Maratha Reservation : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक, जालन्यात एसटी महामंडळाची बस पेटवली

मनोज जरांगे आरक्षणाच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. जालना येथे आंदोलकांनी एसटी बस पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद ठेवली आहे. दरम्यान, या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या साठी संचार बंदी देखील ठेवण्यात आली आहे. तसेच जालना, बीड, संभाजीनगर येथील इंटरनेट सेवा १० बंद घेवण्यात आले आहे. आंदोलक हिंसक होऊन सरकारी मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. यामुळे या जिल्ह्यातील बस सेवा देखील बंद ठेवण्यात आली आहे.

Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील उपचार घेण्यास तयार! अंतरवाली सराटी येथे रवाना, पुढची दिशा ठरवणार

आंदोलनाच्या छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व आगारातील एसटी बसची सेवा ही तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहे. त्यानुसार या परिसरातील एसटी बसची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पुढील सूचना मिळेपर्यंत जालन्यातील बस फेऱ्या बंद केल्या आहेत. मराठा आंदोलकांनी बस जाळल्याचा आरोप केल्यानंतर एसपी जालना यांच्या सूचनेवरून हे पाऊल उचलण्यात आले आहे. या सोबतच जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या परिसरात आता मराठा आंदोलकांना एकत्र येण्यास बंदी करण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मुंबईतील सागर बंगल्यासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. काल ते भांबेरी येथे थांबले होते. पोलिसांनी या ठिकाणी काल पासून मोठा बंदोबस्त ठेवला आहे. जालना जिल्ह्यात देखील हीच स्थिति आहे. दरम्यान, यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे परत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज पाच वाजता ते पुढील निर्णय घेणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग