Manoj jarange patil health update : बीड येथील सभेनंतर मनोज जरागे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना सर्दी खोकला व डोकेदुखीचा त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथी दवाखान्यात नेण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील हे काल बीड येथील सभा आटोपून त्यांच्या गावी अंतरवली येथे आले होते. दरम्यान तयांचे क्रिकेट खेळतांनाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना संभाजी नगर येथे उपचारासाठी घेऊन जाण्यात आले आले आहे.
मनोज जरांगे पाटील यांना संभाजी नगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना तपासले असून त्यांना अशक्तपणा आल्याचे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. जरांगे पाटील यांना सर्दी, खोकला आणि डोके दुखी जाणवत आहे.
मराठा आरक्षणासाठी मजोज जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टीमेटम दिला होता. ही मुदत आज संपत आहे. असे असले तरी सरकारने यावर कोणतेही ठोस आश्वासन अथवा पावले उचलली नाहीत. यामुळे आंदोलनावर ठाम असल्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी शनिवारी बीड येथे झालेल्या सभेत केला होता. जरांगे पाटील हे वीस जानेवारीपासून मुंबईमध्ये उपोषण करणार आहे.
जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत सरकारला पुन्हा एक संधि दिली. दरम्यान, भुजबळ यांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा देखील समाचार जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला.
संबंधित बातम्या