Maratha Reservation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आज नववा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, अशा मागणीवर ते ठाम आहेत. सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाहीतर येत्या २१ फेब्रुवारीला आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खराब झाल्यानंतर हायकोर्टाच्या सूचनेनुसार त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. डॉक्टरांच्या पथकाने आज सकाळी मनोज जरांगेंची आरोग्य तपासणी केली. जरांगे यांची प्रकृती आता सुधारत असल्याचे यावेळी डॉक्टरांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे आणि सगेसोयरे अंमलबजावणी झालीच पाहिजे, या मागणीवर आम्ही ठाम आहेत. आधीच ६२ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. आरक्षण ५० टक्क्यांच्या आत येऊच शकत नाही. सरकार मराठा समाजाला किती टक्के आरक्षण देते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. आरक्षण रद्द झाले तर आम्हाला आंदोलन करावे लागेल. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र हवे आहे. आम्ही ओबीसीच आहोत, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
"सगेसोयरे अमलबजावणीही करुन हवी आहे. गेल्या साडेतीन महिन्यांपासून काम सुरु आहे.कोट्यवधी मराठ्यांच्या हिताचा हा विषय आहे. जर येत्या २० फेब्रुवारीला ते मिळाले नाहीतर २१ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन पुढची दिशी ठरवली जाईल", असाही इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
संबंधित बातम्या