मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Manoj jarange patil : अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

Manoj jarange patil : अन्यथा २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; जरांगेंनी विधानसभेचा फॉर्म्युलाच सांगितला

May 18, 2024 07:08 PM IST

Maratha Reservation : मराठा कुणबी एकच जात असल्याची मागणी सरकारने मान्य न केल्यास निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील

Manoj jarange patil On Vidhan Sabha : मराठा आंदोलनाचे संघर्षकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा इशारा दिला आहे.सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र न दिल्यास तसेच मराठा कुणबी एकच जात असल्याची मागणी सरकारने मान्य न केल्यास निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे. राज्यातील सर्व जातींना सोबत घेऊन विधानसभेच्या २८८ जागा लढवणार, तसेच ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील(Manoj jarange patil )यांनी म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मनोज जरांगे म्हणाले की, राजकारण माझा मार्ग नाही. माझा राजकारणाशी काही संबंध नाही. मला मराठा समाजातील पोरं मोठी करायची आहेत. समाजाला ताकद द्यायची आहे. जर तुम्ही हे नाही केले तर २८८ जागांवर मी सर्व जातीचे उमेदवार उभे करून गोरगरिबा उमेदवारांना निवडून आणणार. सर्व जातीधर्माचे लोक घेणार मग मी मागे हटणार नाही. त्यावेळी नाव घेऊन कुणाला पाडायचं हे स्पष्ट सांगेन, असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला. मराठा समाज एकत्र आल्याने तुमची लोकसभेला फजिती झाली असून हे तुमच्यासाठी संकेत आहेत. तेव्हा माझ्या नादी लागू नका. सरकारकडे माझी एकच मागणी आहे. सगेसोयरे अंमलबजावणी करा आणि मराठा व कुणबी एकच जात असल्याचे मान्य करा.

सरकारने धनगर समाजाला फसवलं, मराठ्यांना फसवलं. सरकारशी आमचं वैर नाही. पण मी कार्यक्रम लावणार, गोरगरिबांना निवडून आणणार. मराठ्यांसोबत अन्य ४-५ जाती एकत्र आल्या तर १०० टक्के सत्ता खेचून आणेन. मग होऊ द्या ७-८ उपमुख्यमंत्री, एक मुस्लीम, एक धनगर, एक दलित, लिंगायत समाज सगळ्यांचा एक एक उपमुख्यमंत्री करू. शेतकऱ्यांचा उपमुख्यमंत्री झाला तर दणादण शेतकऱ्यांची कामे करतील. मी मैदानात उतरलो, तर गोरगरिबांच्या हाती सत्ता द्या, निवडून येणारे कसे काम करणार नाहीत ते मी बघतो, असं आवाहनही जरांगेंनी जनतेला केले.

जरांगे म्हणाले की, राज्यात मराठ्यांनी कधीच जातीवाद केला नाही. समाजाचं काम सोडून मला अन्य कशासाठी वेळ नाही. धनंजय मुंडे उपकार ठेवणारे आहेत असं वाटत होते. परंतु गेल्या २-३ दिवसांत मला त्यांच्या कार्यकर्त्यांकडून धमक्या येत आहेत. ही परतफेड असेल तर पुढे विधानसभेला बघू. तुमच्या नेत्यांना राज्यात फिरायचंय लक्षात ठेवा. मराठा एकजूट आहे. अन्याय सहन करत नाहीत. मराठा आणि वंजारी यांच्यात काही वितुष्ट नाही. यासाठी बहिण भावाने सलोख्याची भूमिका घ्यायला हवी होती. निवडणूक पार पडल्यामुळे तुम्हा आता गुरगुर करायला लागलाय. जे झालं असेल ते झालं, पुढे एकत्रित राहू असं आवाहन बहिण भावाने करायला हवं होते, पण ध्यानात ठेवा अजून विधानसभेच्या निवडणुका आहेत, असा निशाणा जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे-पंकजा मुंडे यांच्यावर साधला.

टी-२० वर्ल्डकप २०२४